फरार आरोपींची मालमत्ता जप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:19 AM2019-03-14T11:19:54+5:302019-03-14T11:20:18+5:30

दहा वर्षांपासून वॉण्टेड : जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहिम सुरू

The properties of the absconding accused will be confiscated | फरार आरोपींची मालमत्ता जप्त होणार

फरार आरोपींची मालमत्ता जप्त होणार

Next

नंदुरबार : निवडणुकीची पार्श्वभुमी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी १९ फरारी आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. दरम्यान, हद्दपार असलेला एक जण शहरात आढळून आल्याने त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी ही मोहिम सुरू केली आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी गुन्ह्यातील १९ प्रमुख आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अशा आरोपींवर सीआरपीसी कलम ८३ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. या फरार आरोपींमध्ये फत्तेसिंग बावजी मावची रा.तीनटेंभा, ता.नवापूर, टेबरसिंग अलकाऱ्या पावरा रा.चांदसैली, ता.धडगाव, रेवजी कोट्या गावीत, रा.हळदाणी, ता.नवापूर, प्रभाकर भावराव वाघमारे, रा.सिलिंगपूर, ता.तळोदा, वन्या सिंगा वसावे रा.कर्डीबारला, ता.अक्कलकुवा, शेख गणी शेख मोहम्मद रा.शहाआलम बाबा दर्गा अहमदाबाद, जावेदअली उर्फ अमजद अख्तरअली रा.भुसावळ, शेख जमान युसूफअली रा.दिवराज कॉलनी सेंधवा, कुरबानअली सैय्यदअली रा.जाम मोहल्ला, भुसावळ, सिराजअली अस्लबअली रा.जाम मोहल्ला, भुसावळ,गुलाब हुसेन हैदरखान रा.भुसावळ, हमीदखॉ शौकतखाँ पठाण, रा.मोतीबाग, सेंधवा. राजूसिंग रणजितसिंग राजपूत, रा.भोपाळ, अजीजखान बशीरखान फकीर मोहम्मद रा.इंदोर, बालाजी रामकिसन मराठे रा.सुरत, अरमचंद रामा गुजर, रा.भिलवाडा, नौशादअली सिद्दीकी शेख रा.साहेबगंज, अस्मत जंगशेर अली शेख रा.साहेबगंज, शेरसिंग रणसिंग तडवी रा. बडवाणी अशी फरार आरोपींची नावे आहेत.
फरार आरोपी पकडण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष पथके तयार करण्यात येवून पथकातील कर्मचारीकडून आरोपींतांच्या घरी , नातेवाईकांकडे तपास करण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांना देखील याबाबत कळविण्यात आले आहे. मालमत्तेची माहिती काढल्यानंतर न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम ८३ अन्वये अहवाल सादर करून आरोपीतांच्या मालमत्तेवर जप्ती आणून जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा या बाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title: The properties of the absconding accused will be confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.