टंचाईच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात 57 कुपनलिकांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:40 PM2018-11-24T12:40:10+5:302018-11-24T12:40:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. याशिवाय शहरालगतच्या परंतु ग्रामिण भागात येणा:या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा व्हाव यासाठी शहरी भागात कुपनलिका करून ते पाणी संबधीत वसाहतींना पुरविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातात यंदा अपु:या पजर्न्यमानामुळे अपेक्षीत पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे पाणी पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळातील संकट लक्षात घेता पालिकेने आतापासूनच पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक प्रभागात कुपनलिका करून मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.
सध्या पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा
सद्य स्थितीत शहरात पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड व किमान 45 ते 55 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे सद्यातरी शहरवासीयांना पाणी टंचाईचे संकट फारसे नाही. परंतु येत्या काळात ते जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा वेळेत कपात होणे शक्य आहे. अद्याप पालिकेने त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
विरचकमध्ये 40 टक्के साठा
विरचक प्रकल्पात सद्यस्थिती 40 टक्के पाणीसाठा आहे. हाच पाणीसाठा काटकसरीने आणि योग्यरित्या वापरल्यास सात ते आठ महिने हे पाणी पुरेल इतके आहे. याशिवाय पालिकेने आंबेबारा धरणातील पाणीसाठा देखील आरक्षीत केला आहे. आंबेबारा धरणातील पाणी चारीद्वारे आष्टे येथील पंपींग स्टेशनमध्ये आणून तेथून शहराच्या 25 ते 30 टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही अशी एकुणच शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी येणा:या कुठल्याही परिस्थितीला आणि संकटाला सामोरे जाण्यासाठी पालिकेने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.
कुपनलिकांचा प्रस्ताव
शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करून देण्याची मागणी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जेणेकरून विरचकमधील पाणी पुरवठय़ावर मर्यादा आलीच तर या कुपनलिकांच्या माध्यमातून संबधीत प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करता येईल. शहरात 19 प्रभाग असून प्रत्येकी तीन कुपनलिका केल्यास त्यांची संख्या तब्बल 57 र्पयत जाणार आहे. शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुपनलिका करून देण्यास प्रशासन तयार होईल किंवा कसे याबाबत मात्र संभ्रमच राहणार आहे.
शहराबाहेरील वसाहती तहानलेल्या
शहराबाहेरील परंतु लगतच्या गावांच्या हद्दीतील वसाहतींमध्ये सद्य स्थितीत मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. संबधीत गावांची पाणी पुरवठा योजना मर्यादीत आहे. त्यामुळे नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा करण्याची क्षमता अशा ग्रामपंचायतींची नाही. परिणामी नागरिकांना खाजगी कुपनलिका कराव्या लागत आहेत. परंतु त्यांनाही अपेक्षीत पाणी लागत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत जमिनीची पाणी पातळी खोल गेली आहे. तर शहर हद्दीत पाणी पातळी ब:यापैकी आहे. त्यामुळे शहरी हद्दीत कुपनलिका करून अशा वसाहतींना पाणी पुरवठा करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.