नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 PM2018-05-29T12:56:05+5:302018-05-29T12:56:05+5:30
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय वनमंत्रालयाकडे अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती आह़े
पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट लक्कडकोट येथून झाली आहे. गुजरात हद्दीलगत तालुक्याच्या सिमावर्ती पश्चिम भागात वनसंपदेची पूवार्पार होत आलेली हानी गत 10 वर्षांत भरुन निघाली आहे. यातून येथे सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात वनसंपदा बहरली आहे. वनसंरक्षण समित्या सक्षमपणे कामे करुन जंगलाचा सांभाळ करीत आल्याने वनांचे वास्तविक स्वरुप आता पुन्हा नव्याने समोर येत आहे. तडस, बिबट, रानडुक्कर, मोर, ससे, वानर, कोल्हे यांच्यासह इतर असंख्य प्राण्यांचा वावर लक्कडकोट ते चरणमाळ घाटातील प्रतापपूर वनक्षेत्र व डांग जिल्ह्यातील लगतच्या भागात दिसून आले आह़े या क्षेत्रात वनसंपदा वाढीस आली आहे. लगतच्या गुजरात वन हद्दीत सुबीर, काकशाळा व मलंगदेव या सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रात जंगलाचा सांभाळ सुनियोजित पध्दतीने झाला असल्याने दोन राज्यांचा हा सीमावर्ती भाग वनसंपदेने बहरला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे भर ऊन्हातही तग धरुन असल्याने जंगलात वास्तव्य करणा:या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होत आली आहे.
दोन राज्यांचा सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र राखीव वन क्षेत्र असुन राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित होण्यास येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात वास्तव्य करणा:या प्राण्यांना हक्काचे स्थान मिळण्यासह त्यांच्या वास्तव्यामुळे मनुष्यास निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदतच होणार आहे. शिवाय वनसंपदेचे रक्षण करणेही सोयीचे ठरु शकेल.