लघुप्रकल्पांचा दुरूस्तीचा प्रस्ताव धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:02 PM2019-08-23T22:02:33+5:302019-08-23T22:02:37+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, गढवली व सिंगसपूर या चारही लघूसिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी ...
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, गढवली व सिंगसपूर या चारही लघूसिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी शहादा उपविभागाने साधारण पावणे दहा कोटींचा प्रस्ताव गेल्या वर्षापासून पाठविला असून, तो कार्यवाही अभावी धुळखात पडला आहे. परिणामी निधी अभावी प्रकल्पांचीही दुरुस्ती रखडली आहे.
यंदा सर्व प्रकल्प समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. माो त्याची दुरूस्ती होत नसल्याने प्रचंड पाणी वाया जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी तरी दखल घ्यावी, अशी शेतक:यांची अपेक्षा आहे.
तळोदा तालुक्यातील आदिवासी शेतक:यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या लघुसिंचन विभागाने रोझवा, पाडळपूर, गढवली व सिंगसपूर असे चार लघुसिंचन प्रकल्प उभारले आहेत. तथापि या सिंचन प्रकल्पांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कार्यान्वित केल्यापासून शासनाने एकदाही त्यांची दुरूस्ती न केल्यामुळे सांडव्यांची भिंत तुटली आहे. याशिवाय मोठ-मोठे तडेदेखील गेले आहेत. परिणामी प्रकल्पांनाही गळती लागली असून, तेथून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. दुरूस्तीबाबत शेतक:यांकडून ओरड केली जाते. तेव्हा संबंधीतांकडून थातूर मातूर ठिगळ लावले जात असते. वास्तविक या प्रकल्पांमुळे शेतक:यांच्या साधारण हजार, बाराशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असते. मात्र त्याच्या दुरूस्तीबाबत संबंधीत यंत्रणेने आजपावेतो कुठलीच अशी ठोस कार्यवाही करीत नसल्याने शेतक:यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे शेतकरी सांगतात. गेल्या वर्षी सर्वच प्रकल्पांमध्ये 25 टक्यांपेक्षा अधिक जलसाठा होता. तरीही गळतीमुळे शेतक:यांना रब्बीच्या पिकांना लाभ घेता आला नाही. या प्रकल्पांचा परिणाम भूगर्भातील पाण्याच्या पातळीतदेखील दिसून आला होता. कारण मोठय़ा प्रमाणात शेतक:यांचे कृषी पंप निकामी झाली होते. लघुसिंचनाच्या शहादा उपविभागाने या चारही प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी गेल्या वर्षी वरिष्ठ पातळीवर साधारण नऊ कोटी 75 लाख आठ हजार 586 रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु त्यावर कार्यवाही करण्याऐवजी तसाच धुळखात पडला असल्याचा आरोप आहे. या प्रस्तावांमध्ये रोझवा तीन कोटी 81 लाख 39 हजार 697, पाडळपूर एक कोटी 21 लाख 27 हजार 290, गढवली 59 लाख, 15 हजार 30 तर सिंगसपूर तीन कोटी 45 लाख 96 हजार 671 अशी वेगवेगळ्या निधींची रक्कम प्रस्तावित केली आहे. निधी बाबत शहादा उपविभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुद्धा करण्यात आला आहे. तरीही निधी उपलब्ध करण्याबाबत उदासिनता घेतली जात आहे. आताही दोन महिन्यांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार पुनर्प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आतातरी ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा शेतक:यांनी व्यक्त केली आहे.4लघु पाटबंधारे विभागाकडे तालुक्यातील या चारही सिंचनाच्या गळती प्रकरणी मुख्यता सांडव्याची दुरूस्ती, विहरींचे आस्तरीकरण, अश्मपटल, दगडी पाय:या दुरूस्ती, कालवा व धरणातील गाळ याशिवाय झाडे-झुडपे तोडणे आदी कामांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या गळतीमुळे गेलञया वर्षी गोपाळपूर शिवारातील शेतक:यांच्या शेतांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे रोझवा प्रकल्पांच्या गळतीमुळे त्या परिसरातील प्रकल्प बाधितांच्या शेतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मातीच वाहून गेल्याने सुपिक जमीन नापिकी बनली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून दुष्काळावर कायम स्वरूपी मात करण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनांच्या माध्यमातून प्रय} करत असतांना तळोदा व शहादा तालुक्यांमधील लघुप्रकल्पातील जलसाठा केवळ दुरूस्तीअभावी वाया जात असल्याचे विदारक चित्र आहे.