शेतकरी कायद्याच्या अध्यादेशाला स्थगितीच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:45 PM2020-10-08T12:45:46+5:302020-10-08T12:45:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारने आणलेला शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपतर्फे नंदुरबारसह तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून राज्य शासनाचा ...

To protest the suspension of the Farmers Act Ordinance | शेतकरी कायद्याच्या अध्यादेशाला स्थगितीच्या निषेधार्थ धरणे

शेतकरी कायद्याच्या अध्यादेशाला स्थगितीच्या निषेधार्थ धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र सरकारने आणलेला शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपतर्फे नंदुरबारसह तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात भ्आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या कृषी अध्यादेशाचे राज्यात अंमलबजावणी करणारे परीपत्रकाला राज्य सरकारने स्थगीती दिली. राष्ट्रवादीचे नेते शशीकांत शींदे यांच्या अपीलावर सहकार वर पनन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला एकापरीपत्रकान्वये स्थगीती दीली. या निर्णयाचा विरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन पुकारले आहे. आज बुधवारी नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक बाजारपेठ या संकल्पनेमुळे देशातील शेतकरी आर्थीक दृष्टया सक्षम होणार असुन शेतकरी आपला माल आता देशात कुठेही विकु शकतो. त्यामुळे त्याचा कष्टाच्या शेतीमालाला मुबलक दाम मिळणार असल्याने भयभीत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलास राज्यात केंद्राच्या कायदयाचा अंमलबजावणीस स्थगीती दिली आहे. ही बाब शेतकरी विरोधी असुन महाआघडी सरकारच्या शेतकरी विरोधी आदेशाचा आम्ही होळी करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगीतले.
याप्रसंगी प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, संगठन जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजपचे किसान मोचार्चे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पटेल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष सुदाम पटेल, संजय साठे, सतीश पाटील, संजय पाटील, नरेंद्र पाटील, पंकज पाटील, अरुण पाटील, प्रशांत पाटील, विजय नाईक उपस्थित होते.
अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करताना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, तालुका मंडळअध्यक्ष विनोद कामे, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. सुधिर पाडवी, पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, युवा मोर्चा जिल्हा संघटक सरचिटणीस कुणाल जैन,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बापू महिरे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चिटणीस गुलाबभाऊ अहिरे, युवा मोर्चा चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवी शुक्ला उपस्थित होते.

Web Title: To protest the suspension of the Farmers Act Ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.