आश्रमशाळांच्या स्थलांतरास विरोध : दहेल व कंकाळामाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:28 PM2018-07-08T13:28:01+5:302018-07-08T13:28:13+5:30

पालकांचा प्रकल्प कार्यालयावर ठिय्या

Protests against migratory migrations: Dahhel and Kankalamal | आश्रमशाळांच्या स्थलांतरास विरोध : दहेल व कंकाळामाळ

आश्रमशाळांच्या स्थलांतरास विरोध : दहेल व कंकाळामाळ

Next

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील दहेल व कंकाळामाळ या दोन शासकीय आश्रमशाळांच्या स्थलांतर विरोधात तेथील आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्पात तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. 
या वेळी पालकांनी शाळा स्थलांतराबाबत अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. शाळांचे स्थलांतर रद्द झाल्याशिवाय ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर याप्रकरणी पालकांना विश्वासात घेवून एक समिती नेमून जागेची पाहणी केली जाईल. मात्र या शाळा पुन्हा तेथेच भरण्याचे            आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. तथापि                कडक उन्हात पालकांनी तब्बल चार तास प्रकल्पासमोर ठिय्या मांडला होता.
भौतिक सुविधांच्या अभावामुळे तळोदा आदिवासी एकात्मिक विभाग प्रकल्पाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रातील धडगाव तालुक्यातील झापी, सिंदीदिगर, तेलखेडी, त्रिशुल, शेलगदा या पाच तर अक्कलकुवा तालुक्यातील दहेल, कंकाळामाळ, गमन, नाला, खडकापाण या पाच अशा एकूण 10 शासकीय आश्रमशाळांचे स्थलांतर त्या-त्या तालुक्यात केले आहे. तथापि डनेल व कंकाळामाळ या शाळा ज्याठिकाणी स्थलांतर झाल्या आहेत. तेथेदेखल भौतिक सुविधांची वानवा आहे. ज्या इमारती आहेत तेथे खोल्या अपूर्ण आहेत. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा         संख्येने विद्यार्थी राहू शकणार नाही. त्यामुळे विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा प्रश्ननिर्माण होणार आहे. या शाळांचे स्थलांतर रद्द करून पुन्हा तेथेच           शाळा सुरू कराव्यात यासाठी आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेत तेथे तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. या वेळी प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी पालकांच्या समोर येवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. या वेळी पालकांनी चांगले धारेवर धरले          होते.
वास्तविक शाळा स्थलांतर केलेल्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. तेथील हातपंप बंद असल्यामुळे जवळील नाल्यावर आंघोळीसाठी विद्याथ्र्याना जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. इमारतीचा प्रश्न असल्यामुळे शाळांचे तात्पुरते स्थलांतर केल्याचे प्रकल्पाधिकारी गौडा यांनी पालकांना सांगितले. शिवाय जागांचा प्रस्तावदेखील संबंधित वन विभागाकडे परवानगीसाठी पाठविला आहे. मात्र पालकांचे यावर समाधान झाले नाही. कारण शासकीय जागे बरोबरच खाजगी जागा दान देण्याचा प्रस्ताव प्रकल्पाकडे गेल्या अनेक वर्षापासून दिला आहे. त्यावर अजूनही प्रकल्पाने कार्यवाही केली नाही. अन् आता अचानक शाळा स्थलांतर केल्याने पालक अधिकच संतप्त झाले होते. भौतिक सुविधांबाबत आतापावेतो प्रकल्पाने उदासिन धोरण घेतले होते. आम्ही आमची घरे शाळांसाठी देतो मात्र या शाळांचे स्थलांतर रद्द करावे, अशी मागणी पालकांनी प्रकल्पाधिका:यांसमोर केली. पालकांनी मागणी मान्य होई पावेतो ठिय्या मागे न घेण्याचा          प्रवित्रा घेतल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी स्थलांतराविषयी पालक व अधिका:यांची समिती नियुक्त करून ही समिती जागेची प्रत्यक्ष पाहणी केल. त्यानंतरच स्थलांतराचा निर्णय घेतला जाईल. मात्र शाळा जुन्या ठिकाणीच            पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आदिवासी अधिकार मंचचे दयानंद चव्हाण, मोग्या भिल, नवनाथ ठाकरे, अंजू पाडवी, जगन मोरे, आटूबाई वसावे, सुनील पाडवी, कृष्णा पाडवी, कालूसिंग ठाकरे आदींसह पालक सहभागी झाले होते.
 

Web Title: Protests against migratory migrations: Dahhel and Kankalamal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.