कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पॅकेज द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:43 PM2020-07-03T12:43:59+5:302020-07-03T12:44:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन आणि कोरोनामुळे एस.टी.महामंडळही आर्थिक अडचणीतून जात आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन आणि कोरोनामुळे एस.टी.महामंडळही आर्थिक अडचणीतून जात आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. जनतेला एस.टी.ची किफायतशीर व सुरक्षीत सेवा मिळावी यासाठी पुर्ण वेतन मिळावे व महामंडळास आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी महाराष्टÑ एस.टी.वर्कस काँग्रेस अर्थात इंटकतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात इंटकेन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामंडळातील कर्मचाºयांचे पगार आधीच कमी आहेत. त्यात ७० व ५० टक्के पगार दिला जात आहे. त्यातही विविध कपाती केल्या जात आहेत. त्यामुळे अतीशय कमी पगार कर्मचाºयांच्या हाती पडत आहे. त्यामुळे महामंडळास सार्वजनिक वाहततुक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने हजार कोटी रुपये अनुदान देण्यात यावे.
मे व जून या महिन्याचे उर्वरित ५० टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे. जून देय जुलै या महिन्याचे वेतन देय असलेल्या तारखेस देण्यात यावे. एस.टी.कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन देण्यात यावे. देशातील इतर राज्याप्रमाणे प्रवाशी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारण्यात यावा. राज्यातील सर्व टोल टॅक्स माफ करण्यात यावा. मोटार वाहन कर माफ करण्यात यावा. डिझेल वरील व्हॅट कर माफ करण्यात यावा.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश पारीत करावे. वस्तू व सेवा करात सूट द्यावी. परिवर्तन बस खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करावे. एस.टी.महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाययोजना करावी. खाजगी कंत्राटे रद्द करावी यासह इतर विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून एस.टी.सेवा बंद आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तालुका मुख्यालय स्तरावर एस.टी.सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.
एस.टी.ने आता मालवाहतूक देखील सुरू केली आहे. त्याला बºयापैकी प्रतिसाद मिळाला आहे. परंतु त्यामुळे मात्र एस.टी.चे नुकसान भरून निघणे शक्य नाही.