नंदुरबार एड्स नियंत्रण विभागातर्फे एड्समुक्त गावासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:00 PM2017-12-01T12:00:55+5:302017-12-01T12:01:02+5:30

Public awareness for AIDS-free village through Nandurbar AIDS Control Department | नंदुरबार एड्स नियंत्रण विभागातर्फे एड्समुक्त गावासाठी जनजागृती

नंदुरबार एड्स नियंत्रण विभागातर्फे एड्समुक्त गावासाठी जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागातर्फे  एड्सला हद्दपार करण्यासाठी गाव पातळीपासून सुरुवात करण्यात आली आह़े अधिकारी व कर्मचा:यांकडून ‘एड्समुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात येत आह़े त्याच बरोबर गावातील तरुण-तरुणींना लगAाआधी ‘एचआयव्ही’ची तपासणी करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आह़े
देशासह संपूर्ण जगाला एड्सची समस्या  जाणवत आह़े त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारही एड्स नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबवित आह़े 
एड्स बाबत असलेले समज, गैरसमज यांची माहिती तरुणाईला मिळावी यासाठी  जिल्हा प्रशासनाकडूनही मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आह़े त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाकडून तरुणाईच्या समुपदेशनावर अधिक भर देण्यात येत आह़े 
ग्रामपंचातीकडूनही होतोय ठराव़़
‘एड्समुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यासाठी ग्रामपंचायतही महत्वाची भुमिका पार पाडत आह़े लगAाआधी तरुणाईने एचआयव्हीची तपासणी करावी असे ठराव ग्रामपंचातीकडून मांडले जात आह़े जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाकडून दर महिन्याला एचआयव्ही तपासणीसाठी आलेल्या सुमारे 10 हजार रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आह़े एड्सबद्दल त्यांच्या मनात असलेली भिती घालवण्यात येत आह़े 
जिल्ह्यातील 1 जिल्हा सामान्य रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालये, 14 ग्रामीण रुग्णालय, 59 प्राथमिक आरोग्य केंद्र आदींमध्ये मोठय़ा प्रमाणात एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाचे काम सुरु आह़े महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभागाकडून महिन्याला मुबलक प्रमाणात औषधीं तसेच इतर किटचा पुरवठा करण्यात येत आह़े 
जिल्ह्यात साधारणत चार हजार 300 एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आह़े त्यातील साडेतीन हजार रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आह़े यात गुजरात राज्याच्या सिमावर्ती भागातीलही रुग्णांचा समावेश  आहेत़ 
एड्सला हद्दपार करण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आह़े त्यासाठी गावोगावी जाऊन ग्रामस्थांमध्ये आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आह़े 
एचआयव्ही समुपदेशनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टोल फ्री नंबरदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आह़े बहुतेक रुग्ण हे थेट रुग्णालयात येण्यास धजावत नाहीत त्यामुळे अशांसाठी दुरध्वनीवरुन चौकशी तसेच समुपदेशनाची             सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आह़े
 

Web Title: Public awareness for AIDS-free village through Nandurbar AIDS Control Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.