स्वच्छतेबाबत जनजागृती उपाययोजना मात्र शून्य : धडगाव येथील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:50 AM2017-11-27T11:50:33+5:302017-11-27T11:50:46+5:30
शौचालयांअभावी नागरिकांची गैरसोय
Next
ल कमत न्यूज नेटवर्कधडगाव : शहरात स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. येथे तत्काळ स्वच्छतागृह व शौचालय बांधून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे. स्वच्छतेबाबत गाजावाजा करीत जनजागृती केली जात आहे मात्र उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.धडगाव, रोषमाळ बुद्रुक, वडफळ्या व जुने धडगाव मिळून तयार झालेल्या धडगाव नगरपंचायत अंतर्गत येणा:या परिसरात आतार्पयत एकही स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले नाही. ग्रामपंचायतीचे अस्तित्व असतांनाही स्वच्छतागृह व शौचालय बांधण्याबाबत दुर्लक्ष केले होते. नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर धडगाव शहरवासीयांची मोठी आशा होती. परंतु नगरपंचायत अस्तित्वात येवून दोन वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटून नागरिकांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेविषयी तालुक्यात मोठा गाजावाजा करून जनजागृती केली जात आहे. त्यात अधिका:यांच्या बैठका, पथनाटय़, व शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भिंतींवर घोषवाक्य लिहीणे, पोस्टर लावणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छतेविषयी नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. परंतु झपाटय़ाने वाढणा:या धडगाव शहरात स्वच्छतागृह व शौचालय बांधण्याविषयी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरात तीन ठिकाणी स्वच्छतागृह बांधणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तेथेही जागेचा वाद असल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे समजते. बसस्थानकात तोडके-मोडके का असेना स्वच्छतागृह होते. त्याचा वापरही केला जात होता. जास्त खराब झाल्यामुळे ते नगरपंचायतीने ताब्यात घेऊन नवीन बांधकाम करण्यासाठी पाडण्यात आले. बसस्थानकातील स्वच्छतागृह पाडून चार ते पाच महिन्याचा कालावधी झाला. परंतु त्या बांधकामाविषयी काहीच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता मात्र शहरातील व तालुक्यातील बाजारात येणा:या नागरिकांना उघडय़ावर शौचास व लघुशंकेसाठी जाण्यास भाग पाडले जात आहे.एकंदरीत स्वच्छतागृह व शौचालय बांधून ख:या अर्थाने धडगाव शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देऊन होणारे हाल थांबवण्याची गरज आहे.