मोबाईल ‘फिवर’च्या दुष्परिणामांची देखाव्याव्दारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:11 PM2018-09-19T12:11:28+5:302018-09-19T12:11:35+5:30

देखावा : कुणबी पाटील युवा मंचचा उपक्रम

Public awareness through the visual effects of mobile 'fever' | मोबाईल ‘फिवर’च्या दुष्परिणामांची देखाव्याव्दारे जनजागृती

मोबाईल ‘फिवर’च्या दुष्परिणामांची देखाव्याव्दारे जनजागृती

Next

नंदुरबार : नंदुरबार येथील कुणबी पाटील युवा मंचतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आह़े यंदा मोबाईलच्या अतिरेकामुळे कोणत्या गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते याचा चित्तथरारक देखावा साकारण्यात आला आह़े
मागील वर्षी मंडळाकडून व्यसनामुळे होणा:या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आलेली होती़ दरवर्षी युवा मंचच्या कार्यकत्र्याकडून नवनवीन संकल्पनांवर आधारीत देखावे साकारण्यात येत असतात़ यंदा मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणते अपघात होऊ शकतात़ यावर मंचाकडून देखावा साकारण्यात आला आह़े 
‘सेल्फी ठरतोय जीवघेणा’ या संकल्पनेवर देखावा आह़े देखाव्यात एका उंच टेकडीवर सेल्फी काढत असताना जागेचा अंदाज न आल्याने खोल दरीत पडलेल्या एका युवकाचा प्रसंग दाखवण्यात आला आह़े सेल्फी काढण्यात सध्याचा युवकवर्ग इतका दंग आहे की आपल्या अवतीभोवती काय सुरु आहे, याचीही तसदी संबंधितांकडून घेतली जात नसल्याचेच यातून वर्णन केले जात आह़े यावेळी होणा:या आवाज व युवक दरीत पडत असतानाच्या प्रसंगामुळे देखावा पाहण्यासाठी आलेले भाविक अवाक झाल्याशिवाय राहत नाहीत़ 
दुस:या एका प्रसंगात एक युवती मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावरुन चालत असत़े मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावर चालने धोक्याचे असल्याचे वारंवार जेष्ठांकडून सांगण्यात आल्यावरही युवती याकडे कानाडोळा करते व क्षणात एक वाहन युवतीस जोरदार धडक देत अपघात होतो़ व यात ती गतप्राण झाल्याचे दाखवण्यात आले आह़े त्यामुळे मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवणे, रस्ता ओलांडणे आदी कुठलेही काम करु नका असा संदेश यातून देण्यात आलेला आह़े तिस:या एका प्रसंगात दोन मित्रांचे मोबाईलवर संभाषण दाखवले आह़े या प्रसंगात जोरदार पाऊस पडत असून विजांचा कडकडाट होत असल्याचे दाखवण्यात आले आह़े वातावरण योग्य नसतानासुध्दा मित्रासोबत मोबाईलवर बोलने चांगलेच महाग पडत़े जोरदार आवाज करत वीज एका मित्राच्या अंगावर पडल्याचे दृष्य़ांमध्ये दाखवण्यात आलेले आह़े चौथा प्रसंग मोबाईलवरील जीवाघेणा गेमवर आधारीत आह़े एक मुलगा मोबाईलवरील धोकेदायक गेमच्या आहारी जावून कालांतराने आत्महत्या करीत असल्याचे दाखवण्यात आले आह़े 
सध्या मोमो चॅलेंज, ब्लू व्हेल सारखे धोकेदायक व्हीडीओ गेममुळे विद्यार्थी त्याच्या आहारी जात आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे नीट लक्ष देऊन त्याला दिलेल्या मोबाईलचा वापर तो कसा करीत आहे हे बघणे महत्वाचे असल्याचा संदेश या देखाव्यांमधून देण्यात आलेला आह़े
 

Web Title: Public awareness through the visual effects of mobile 'fever'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.