बेटी बचाओसाठी जिल्हाभरात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:02 PM2020-01-21T12:02:50+5:302020-01-21T12:03:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानातंर्गत जनजागृती करिता ...

Public awareness throughout the district to protect the island | बेटी बचाओसाठी जिल्हाभरात जनजागृती

बेटी बचाओसाठी जिल्हाभरात जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानातंर्गत जनजागृती करिता एलईडी रथाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.
उद्घाटन नूतन अध्यक्षा सिमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, बापूराव भवाने, डॉ.वर्षा फडोळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रमोद लाटे, बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी आदी उपस्थित होते.
जनजागृतीचा रथ २० जानेवारी ते ३ फेंब्रुवारी या कालावधीत जिल्हयातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी फिरणार आहे. त्यात प्रामुख्याने चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, धनराट, प्रकाशा, सांरगखेडा, मंदाणा, कहाटूळ, शनिमांडळ, रनाळा, आष्टे, ढेकवद, कोळदा लहान शहादा, खापर, वाण्याविहिर, ब्रिटीश अंकुशविहिर, मोरंबा, रायसिंगपुर, तोरणमाळ, बिलगांव, धनाजे, चुलवड, राजबर्डी, सोन, कलसाडी, पाडळदा, आडगांव, वेली, काठी याप्रमाणे तालुकानिहाय या व्हॅनचे फिरस्ती नियोजन आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाअंतर्गंत या कालावधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सदरील सप्ताहात नंदुरबार जिल्हयात बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांची मोठया प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून विविध स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानाची मुख्य उदिदष्टये म्हणजे लिंग निवडीस प्रतिंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे इत्यादी असून सदर अभियान महिला व बालविकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाव्दारा संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

एलईडी स्वरूपाचा पडदा असलेल्या या रथावर बेटी बचाओ, बेटी पढाओ याअंतर्गत विविध वृत्तचित्र, लघुपट, जनजागृतीपर उपक्रमांचे व्हिडीओ दाखविले जाणार आहेत. नियोजनात असलेल्या गावांमध्ये थांबून गावाच्या मध्यभागी हा रथ या सर्व बाबींचे प्रेक्षेपण करणार आहे. मुलींची संख्या वाढवावी व त्या शिक्षित व्हाव्या हा त्यामागचा उद्देश आहे.

Web Title: Public awareness throughout the district to protect the island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.