नंदुरबारात जलदौडद्वारे करण्यात आली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:18 PM2018-03-23T12:18:12+5:302018-03-23T12:18:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जागतिक जल दिनानिमित्त नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे जलदौड घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली जलदौडची सुरूवात शहरातील संजय टाऊन हॉलपासून करण्यात आली. या वेळी विविध घोषणादेत पंचायत समिती सभागृहात या दौडचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. कार्यक्रमास निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 16 ते 21 मार्च या कालावधीत विभागांतर्गत असलेले अभियंते व कर्मचा:यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांबाबत अभियंता व्ही.आर. जाधव, किशोर नाईक, एन.पी. विसपुते, आर.आर. गावीत, आर.एस. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी पन्हाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
जल साक्षरता यशदा पुणे यांच्याकडून आलेल्या कार्यक्रम सूचीनुसार ग.दी.माडगुळकर यांच्या ‘नदीचे माहेरघर’ या कवितेचे वाचन संदीप भालेराव यांनी केले. अनिल पवार यांनी मार्गदर्शन करताना पाण्याची बचत करण्याची सद्य:स्थितीत गरज असल्याने विविध उपाययोजनांची व उपक्रमांची सुरूवात स्वत:पासून करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन स्नेहल भावसार यांनी केले. सामूहिक जलप्रतिज्ञा व्ही.आर. जाधव यांनी दिली.