केंद्र व राज्यातील सरकारमुळे जनता होरपळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:05 PM2017-10-26T13:05:10+5:302017-10-26T13:05:15+5:30
ट्रक टर्मिनलचे उदघाटन : अमित देशमुख यांची सरकारवर टिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशात हवा बदलत आह़े लोकांना अच्छे दिन सांगून फसवणूक झाल्याचे समजून येत आह़े कजर्मुक्ती करून घेण्यासाठी शेतक:यांकडून अर्ज भरून घेतले पण कजर्माफी दिली नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणा आणि निर्णयांमुळे राज्यासह देशातील जनता होरपळून निघाली आहे असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केल़े
नंदुरबार शहरात नगरपालिकेच्या लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होत़े शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात हा कार्यक्रम झाला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री माणिकराव गावीत, आमदार डी़एस़अहिरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार क़ेसी़पाडवी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सभापती रंजना नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े
कार्यक्रमात आपल्या खुमासदार शैलीत बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, राज्य सरकारने ऐन दिवाळीत गाजावाजा करत त्या-त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र दिले होत़े तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज भरून घेतले, पण कजर्मुक्ती काही प्रत्यक्षात झालेली नाही, सरकारमुळे व्यापारी बेजार आहेत, चपातीवर पाच टक्के जीएसटी आह़े गुजरातमध्ये पूर्वी खाक:यावर 18 टक्के जीएसटी होता आता तो पाच टक्के केला आह़े हॉटेलमध्ये जेवण करून येणा:या सामान्य नागरिकाला बिल पाहून राज्य आणि केंद्र सरकार सोबत जेवल्याचा भास होतो़ माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा नंदुरबार शहराशी असलेला स्नेह आपण कायम ठेवणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितल़े
प्रारंभी सारंगबुवा रोकडे यांच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केल़े त्यानंतर मान्यवरांनी शहीद शिरीषकुमार, शहीद मिलिंद खैरनार व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केल़े प्रास्ताविक नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केल़े आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला़
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, जीएसटी, नोटबंदी सारख्या निर्णयामुळे महागाई वाढून देशातील नागरिकांची फसवणूक झाली आह़े राज्य सरकारने कजर्मुक्तीची घोषणा करूनही 40 लाख शेतक:यांचा सातबारा आहे तसाच आह़े काँग्रेसने शेतक:यांना सरसकट कजर्माफी दिली होती़ आताचं सरकार ऑनलाईन-ऑफलाईनमधून शेतक:यांना फिरवत आह़े शेजारच्या कर्नाटक राज्यात प्रत्येक शेतक:याला 50 हजार रूपयांची सरसकट कजर्माफी दिली आह़े
सूत्रसंचालन प्रा़डॉ़ माधव कदम यांनी केल़े पालिकेचे नगरसेवक, अधिकारी, शहरातील नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े