तुकाराम बागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ चे प्रकाशन
By admin | Published: April 4, 2017 05:55 PM2017-04-04T17:55:20+5:302017-04-04T17:55:20+5:30
सेवानिवृत्त जिल्हाधिकारी टी़क़ेबागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी सकाळी करण्यात आल़े
Next
नंदुरबार,दि.4- सेवानिवृत्त जिल्हाधिकारी टी़क़ेबागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी सकाळी करण्यात आल़े यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद्र महाजन यांनी उपस्थित युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केल़े
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अॅड़ टी़क़ेबागुल, ‘दृष्टीकोन’ या पुस्तकाचे लेखक व राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त यशवंत पवार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वास भोसले, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमाकांत पाटील उपस्थित होत़े या मान्यवरांनी अॅन अल्टीमेटम व दृष्टीकोन या पुस्तकांचे प्रकाशन केल़े
यावेळी यजुर्वेद्र महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्याथ्र्यानी स्वत: मध्ये निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना सोडून द्यावी, निश्चित ध्येय ठरवून त्याविषयी मनात विचार निर्माण केला पाहिज़े
अॅड़ बागुल व पवार यांनी लिहिलेल्या ग्रंथ प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली़ यावेळी दोघांनी पुस्तकातील निवडक उता:यांचे वाचन केल़े डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, समाजविकास आणि विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास यासाठी याप्रकारचे कार्यक्रम आणि साहित्य यांची गरज असल्याचे सांगितल़े यावेळी सरपंच सत्यप्रकाश माळसे, राम चौरे, अॅड़ दत्तू पाडवी उपस्थित होत़े प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केल़े सूत्रसंचालन निलेश गावीत यांनी तर आभार प्रा़ सुतलान पवार, प्रा़ गणेश पवार यांनी मानल़े