विक्रेत्यांकडील प्रचार साहित्य अद्यापही पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:03 PM2019-03-17T12:03:39+5:302019-03-17T12:04:03+5:30
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले ...
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले प्रचार साहित्य तसेच पडून असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारसह शहादा येथील विक्रेत्यांनी विविध प्रचार साहित्य विक्रीसाठी आणले आहे. त्यात झेंडे, बॅनर, टोप्या, बिल्ले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मुखवटे व कागदी मास्क यांचा समावेश आहे. सध्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला असलेला उशीर आणि दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबतचा विलंब ही बाब लक्षात घेता अद्यापही निवडणुकीत पाहिजे तशी रंगत भरली जात नसल्याची स्थिती आहे. परिणामी प्रचार साहित्याला मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात किंवा जिल्ह्यात एखाद्या मोठ्या नेत्याची जाहिर सभा राहील त्यावेळी साहित्याला मोठी मागणी राहणार असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.