शहादा व नंदुरबार तालुक्यात रंगतोय प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:07 PM2018-09-20T15:07:43+5:302018-09-20T15:07:48+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्याने 53 ठिकाणी निवडणूक कार्यक्रम सुरु आह़े यांतर्गत शहादा 22, नवापूर पाच, तळोदा 4 , अक्कलकुवा 2 तर नंदुरबार तालुक्यात 20 ग्रामपंचायतींचा प्रचार सुरू असून उमेदवार गणपती बाप्पाला साकडे घालत मतदारांना मतांसाठी साद घालत आहेत़
नंदुरबार
नंदुरबार तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़ यामुळे उर्वरित 20 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 59 आणि 178 सदस्य पदाच्या जागांसाठी 307 उमेदवार निवडणूक लढवत आहेत़ या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला असून येत्या काळात प्रचाराची रणधुमाळी अधिक रंगतदार होण्याची शक्यता आह़े गेल्या शनिवारी अंतिम माघारीच्या मुदतीर्पयत सदस्य पदासाठी दाखल 387 अर्जापैकी 80 तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी दाखल 91 अर्जापैकी 32 जणांनी माघार घेतली होती़ तीन ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासोबत उर्वरित 20 ग्रामपंचायतीच्या 54 प्रभागात 54 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत़ यात 1 लोकनियुक्त सरपंचाचाही समावेश आह़े बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित 178 जागांसाठी निवडणूकांचा प्रचार सुरू झाला आह़े या प्रचारात सोशल मिडियासोबतच गणपती बाप्पाही उमेदवारांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आह़े नंदुरबार तालुक्यात यंदा प्रथमच गणपती बाप्पा आणि निवडणूका यांचा मेळ बसल्याने प्रचार करणा:यांना आयती संधी चालून आली आह़े याचा पुरेपूर उपयोग करून घेत उमेदवार विविध मंडळांच्या तसेच एक गाव एक गणपतीच्या पेंडॉलमध्ये ठाण मांडून बसत आहेत़
शहादा
शहादा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचा प्रचार रंगण्यास सुरुवात झाली असून लोकनियुक्त सरपंच पदासाठी 72 तर सदस्यपदासाठी 258 उमेदवार रिंगणात आहेत़ यातही सदस्यपदासाठी 22 जागांसाठी अजर्च न आल्याने येथील निवडणूक रद्द झाली आह़े तालुक्यात दुस:या टप्प्यात लोकनियुक्त सरपंच निवडीची ही निवडणूक असल्याने उमेदवार आणि समर्थक यांच्यातील उत्साह दिसून येत आह़े तालुक्यातील भोरटेक येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी विक्रमी 9 उमेदवार रिंगणात आहेत़ त्याखालोखाल लक्कडकोट सात तर अनरद व बोराळे येथे दोघांमध्ये समारोसमोर लढती रंगत आहेत़ शहादा तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती़ नामनिर्देशन मागे घेण्याच्या मदुतीत 10 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिकांना यश आले होत़े तर उर्वरित 22 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आह़े यात प्रचार सुरू झाला असून उत्तरोत्तर हा प्रचार रंगण्याची चिन्हे अधिक आहेत़ तालुक्यात 32 ग्रामपंचायतीच्या एकूण 266 सदस्य पदाच्या जागांसाठी अर्ज मागणवण्यात आले होत़े यातील 131 जागा ह्या बिनविरोध झाल्या तर 22 ठिकाणी एकही अर्ज दाखल झाल्याने येथील निवडणूक रद्द झाली़ यामुळे 113 जागांसाठी सध्या प्रचार सुरू आह़ेशहादा तालुक्यातील सद्यस्थितीनुसार अपवाद वगळता अनेकठिकाणी चौरंग, तिरंगी आणि दुरंगी लढती रंगत आहेत़ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सावळदा येथील तीन जागांसाठी सहर, सोनवल त़बो पाच जागांसाठी 13, जाम येथे दोन जागांसाठी 4, कजर्त-दोन जागांसाठी 3, भोरटेक पाच जागांसाठी 11, मलोणी दोन जागांसाठी चार, कवळीथ 7 जागांसाठी 14, जयनगर 9 जागांसाठी 20, दामळदा 6 जागांसाठी 12, देऊर कमखेडा 9 जागांसाठी 25, गोगापूर पाच जागांसाठी 10, लोंढरे चार जागांसाठी 8, कुढावद पाच जागांसाठी 16, श्रीखेड तीन जागांसाठी आठ, लक्कडकोट 1 जागेसाठी 3, आडगाव येथे 9 जागांसाठी 18, गोदीपूर 2 जागांसाठी 4, कुसूमवाडा 7 जागांसाठी 19, विरपूर-दरा येथील 11 जागोसाठी 27 तर गणोर येथे सहा जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत़ जिल्हा परिषद निवडणूकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणूकांमध्ये यश मिळवण्यासाठी तालुकास्तरावरील विविध राजकीय पक्ष्यांच्या पदाधिका:यांनी कंबर कसली आह़े नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे सदस्य पदासाठी रेवंताबाई लहू भिल, लक्ष्मीबाई उखा पिंपळे, आडची येथे दयाराम सुदाम वळवी, सुशिलाबाई काळूसिंग ठाकरे, शारदाबाई अरूण पटेल, मोग्या सुरसिंग वसावे, सिद्धार्थ सुराजी वळवी, बलवंड येथे महेंद्र प्रताप धनगर, कलाबाई भरत भिल, लहू सुक्राम भिल, मंगलाबाई बापू भिल, रणसिंग भुरेसिंग राजपूत, आरस्तोबाई भटू पानपाटील, जुनमोहिदा येथे जयदेव चत्र्या भिल, कस्तुराबाई लोटन भिल, शोभा विलास पाडवी, मनुबाई रामचंद्र घोडसे, उमर्दे खुर्द येथे जयबाई भिवसन भिल, पंकज नारायण मराठे, सागर रमेश साळूंखे, पुष्पाबाई दगेसिंग राजपूत, शिवराम तुकाराम सोनवणे, सुमनबाई दामा भिल, कमलबाई बापू भिल,जांभीपाडा येथे संजना राजेंद्र वसावे, किरण गेवा पाडवी, कोरीट येथे सुमनबाई कृष्णा भिल, सुशिलाबाई सुदाम कोळी, देविदास लक्ष्मण भिल, भरत इंदल चित्ते, विमलबाई गोमा ठाकरे, संगीताबाई आत्माराम ठाकरे, नंदाबाई जीवन पाटील, प्रल्हाद सूपडू पाटील, भागसरी येथे बापू बाबूसिंग भिल, संगीता पिंटू भिल, वसंत हिरामण पाटील, यमुना बाजीराव भिल, धनराज वक्रा भिल, निर्मलाबाई निंबेसिंग राजपूत, वंदनाबाई कोमलसिंग राजपूत, सुजालपूर येथील संतोष रतिलाल भिल, कविताबाई दिपक सोनवणे, जोत्या मोतीराम भिल, सुशिला कृष्णा भिल, वैजयंताबाई छोटू लाईक, प्रदीप नथ्थू पाटील, वंदना कांतीलाल पाटील, धामडोद येथील चुनीलाल रतीलाल पाटील, अनिता प्रविण मराठे, स्वाती गणेश जगताप, लताबाई हिरामण भिल, गुजरजांबोली येथील शोभा शिवदास ठाकरे, कोकिळा विजय पाटील, केसरपाडा येथे मुन्नीबाई शांतीलाल वळवी, कलमाडी येथे सुवर्णा अनिल पाटील, धनराज नवल पाटील, शांताराम सिताराम पाटील, शोभाबाई त्रिभुवण पाटील, भाईदास फजू ठाकरे, नाशिंदे येथे लक्ष्मण दौलत पाटील, रेशमा जगन जगन पाटील, मिनाबाई अरुण पाटील, प्रकाशा रामदास पाटील, विजूबाई महादू भिल, सुकदेव दत्तू भिल, दयाबाई प्रताप भिल, वावद येथे जयसिंग भिल, मीराबाई भिल, बद्रीनाथ भिल, मिनाबाई पाटील, , राणीबाई भिल यांची बिनविरोध निवड झाली आह़े
शहादा तालुक्यातील करजाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई छोटूलाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली़ माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीत करजई ग्रामपंचायतीसाठी कल्पनाबाई पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल होता़ सदस्यपदासाठी संदीप भटू पाटील, उषाबाई श्रीकृष्ण पाटील आणि वैशाली अजय पाटील यांची बिनविरोध झाली आह़े