नंदुरबारातील खरेदी केंद्रात पहिल्या दिवशी २०० क्विंटल कापूस खरेदी
By भूषण.विजय.रामराजे | Published: October 16, 2023 04:54 PM2023-10-16T16:54:20+5:302023-10-16T16:54:30+5:30
पहिल्या दिवशी केंद्रावर १६ वाहनांमधून २०० क्विंटल कापसाची आवक झाली.
नंदुरबार : तालुक्यातील पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी केंद्रावर २०० क्विंटल कापसाची आवक झाली.
पहिल्या दिवशी केंद्रावर १६ वाहनांमधून २०० क्विंटल कापसाची आवक झाली. या कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार २९० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला. कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजारात कोरडा कापूस विक्रीसाठी आणावा, असे बाजार समितीने कळविले आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, बाजार समितीचे उपसभापती शरद पाटील, संचालक किशोर पाटील, नवीन बिर्ला, मधुकर पाटील, संजय पाटील, लकडू चौरे, गोपीचंद पवार, कापूस खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, गिरीष अग्रवाल, कृष्ण अग्रवाल, गोविंद अग्रवाल, भारतीय कपास निगमचे ग्रेडर जयदीपसिंह ठाकूर, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, संजय वाणी व काळूसिंग वळवी उपस्थित होते.