सीसीसायकडून दोन लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 01:02 PM2020-12-27T13:02:50+5:302020-12-27T13:02:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीसीआयच्या नंदुरबार आणि शहादा येथील खरेदी केेंद्रांवर सध्या कापूस विक्री करण्यासाठी शेतक-यांची झुंबड उडत ...

Purchase of two lakh quintals of cotton from CCS | सीसीसायकडून दोन लाख क्विंटल कापूस खरेदी

सीसीसायकडून दोन लाख क्विंटल कापूस खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सीसीआयच्या नंदुरबार आणि शहादा येथील खरेदी केेंद्रांवर सध्या कापूस विक्री करण्यासाठी शेतक-यांची झुंबड उडत असून दोन केंद्रांवर दोन लाख क्विंटल कापूस खरेदी       करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 
राज्यातील विविध भागात कापूस दरात सीसीआयकडून घट सुरू असताना नंदुरबारात मात्र हमीभावानेच कापूस खरेदी होत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साह वाढला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत सात हजार ११५ शेतक-यांनी नोंदणी केली होती. यातील तीन हजार पेक्षा अधिक शेतक-यांना सध्या केंद्रात कापूस विक्री केली आहे. यातून आतापर्यंत खरेदी केंद्रात ९२ हजार क्विंटल कापूस    आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार       जिल्ह्यात सीसीआयकडून पाच हजार ४९६ ते पाच हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आले आहेत. दुसरीकडे शहादा बाजार समितीकडून चालवण्यात येणा-या सीसीआयच्या केंद्रात कापूस खरेदीचा उत्साह वाढला असल्याचे दिसून आले आहे. येथे नोंदणी करणा-या साडेसात हजार शेतक-यांपैकी २ हजार ५०० शेतक-यांचा ९६हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

पहिल्या ग्रेडचा कापूस सध्या बाजारात  
यंदा जिल्ह्यातलागवड करण्यात आलेल्या १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावरच्या बहुतांश कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने पहिल्या वेचणीनंतर बहुतांश ठिकाणी कापूस झाडे काढून फेकण्यात आली होती. ज्या शेतक-यांच्या झाडांवर उशिराने बोंडअळीने आक्रमण केले. त्याठिकाणी दुसरी वेचणी पूर्ण होवून तिस-या वेचणीला सुरुवात झाली होती. यातून ब-यापैकी कापूस शाबूत होता.  
पहिल्या टप्प्यात येणा-या कापसाचा दर्जा हा चांगला असल्याने सीसीआयकडूनही त्याची खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला गेला आहे. यामुळे या कापसाचे दर हे निश्चित केलेल्या दरांएवढेच आहेत. दरम्यान शेजारील जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरांमध्ये सीसीआयने घट केल्याची माहिती समोर आल्यानंतर शेतक-यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. परंतू अद्याप जिल्ह्यात दोन्ही केंद्रांवर चांगल्या दर्जाचा कापूस येत असल्याने दर कमी होण्याची अद्यापतरी शक्यता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या जानेवारी महिन्यात कापसाचे दर घटण्याची मात्र शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा कापसाची कमतरता असल्याने जानेवारीनंतर हंगाम आटोपण्याची शक्यता आहे. दुस-या टप्प्यातील खराब कापूस आल्यानंतर दरा काहीअंशी कमी होवू शकतात. ही नित्याची प्रक्रिया आहे. परंतू तूर्तास निर्धारित दरच दिले जात आहेत.
-हेमंत चाैधरी, सचिव, 
कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.

Web Title: Purchase of two lakh quintals of cotton from CCS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.