शहाद्यात अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाटय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:57 AM2018-12-13T11:57:14+5:302018-12-13T11:57:19+5:30

शहराची होतेय कोंडी : सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांचा अतिक्रमण काढण्याला पाठींबा

The question of encroachment in Shahada is at Chawatyay | शहाद्यात अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाटय़ावर

शहाद्यात अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाटय़ावर

googlenewsNext

सुनील सोमवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करीत पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांनी अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी         केल्याने शहाद्यातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहादा शहर हे विकसनशील शहर असून, चोहोबाजुंनी शहराची वाढ होतआहे. पूव्रेकडे लोणखेडा बायपास रोडच्या पलिकडे नागरिकांच्या  वसाहती पोहोचल्या आहेत. पश्चिमेकडे मनरदर्पयत तर उत्तरेस मलोणीर्पयत शहराचा विस्तार झाला आहे. दक्षिणेला भेंडवा नाल्यार्पयत लोकवसती झाली आहे.  एकंदरीतच शहराची चोहोबाजुने वाढ होत आहे. मात्र असे असले तरी  शहरात दिवसेंदिवस  वाढणारे अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच अतिक्रमणाचादेखील विस्तार होत असल्याने संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत  आहे. 
बसस्थानक परिसर, नगपालिका परिसर, दोंडाईचा रोड, जुना मोहिदा रोड, प्रकाशा रोड, मेनरोड, डोंगरगाव रोड, खेतिया रोड, पाडळदा चौफुली अशा सर्वच भागात अतिक्रमण हात-पाय पसरत असल्याने शहराचे विद्रूपीकरणाबरोबरच शहराची शांतताही धोक्यात आली आहे. अतिक्रमणा सोबतच अवैध व्यवसायही फोफावत असल्याने शहर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून शहरात दंगली सारख्या घटना घडल्याचा इतिहास असल्या कारणाने अतिक्रमणावर पुन्हा एकदा हातोडा चालविण्याची वेळ आली आहे.
बसस्थानक परिसर आणि भाजी मंडईतील अतिक्रमण पालिकेने काढूनही या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने रहदारीची कोंडी होते. बसस्थानकासमोरील टप:या, लॉ:यांचे आणि दुकानांसमोर लावलेल्या वाहनांमुळे बसचालकांना कसरत करावी लागते. डोंगरगाव रोडवर पुन्हा टप:यांचे अतिक्रमण वाढत असून, अवैध वाहतुकीच्या वाहनांची यात भर पडत असून, या रस्त्यावरही रहदारीची कोंडी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळार्पयत लॉरीधारकांच्या अतिक्रमणाने हा रस्ता दुहेरीमार्ग असूनही या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. पालिकेच्या समोरील चौक टप:यांच्या अतिक्रमणाने भरला असून, नेहमी या चौकात किरकोळ कारणावरून वाद होतात. स्टेट बँक चौकातील भाजी व्यवसायिकांच्या गाडय़ा आणि मोहिदा रोडवरील खाद्य पदाथ्र्याच्या गाडय़ांनी झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालक, नागरीक सारेच त्रस्त झाले आहेत. मेनरोड व नेहरू चौकातील अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून चार चाकी वाहने चालूच शकत नाही, अशी स्थिती आहे.
अतिक्रमणाच्या समस्येने संपूर्ण शहर ग्रस्त झाले असून, शहरभर रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्थायी अतिक्रमणासोबतच शहरात स्थायी अतिक्रमणेदेखील मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भर रस्त्यात घरे, दुकाने आणि प्रार्थन स्थळांचे मोठ-मोठे अतिक्रमण झाल्याने रस्ता असूनही अनेक ठिकाणी त्या रस्त्याचा वापर करता येत नाही. अतिक्रणाची ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातील सदस्यांनी अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करून अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी केल्याने प्रशासनाने विनाविलंब अतिक्रमणाच्या समस्येवर रामबाण उपाय करणे आवश्यक आहे. 

Web Title: The question of encroachment in Shahada is at Chawatyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.