तळोद्यात खतांसाठी दुकानांसमोर लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:50 PM2020-07-05T12:50:21+5:302020-07-05T12:50:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाली असून, खत घेण्यासाठी दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाली असून, खत घेण्यासाठी दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. युरीया सोबत इतर खतांची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
पेरणी झाल्यानंतर शेतकºयांची आता पिकांना रासायनिक खते देण्याची लगबग सुरू झाली आहे. रासायनिक खते घेण्यासाठी शहरातील कृषी दुकानांवर शेतकºयांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत, असे असले तरी युरीया बरोबरच इतर खते घेण्याची सक्ती व्यावसायिकांकडून केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. वरूनच खतांची लिंकिंग केल्याचे म्हटले जात आहे. परंतु शेतकºयांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सहन करून इतर खतेही घ्यावी लागत असल्याची शेतकºयांची व्यथा आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी दखल घेण्याची मागणी आहे. दरम्यान खतांसाठी कृषी दुकानांवर शेतकºयांच्या होत असलेल्या रांगांमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.
तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच शेतकºयांनी युद्ध पातळीवर पेरणी उरकली असून, पिकांना रासायनिक खते देण्याची शेतकºयांनी लगबग सुरू केली आहे. साहजिकच रासायनिक खते घेण्यासाठी तळोदा शहरातील कृषी प्रतिष्ठानांवर शेतकºयांच्या रांगा दिसून येत असल्या तरी पिकांच्या वाढीसाठी टॉनिक असलेल्या युरीयालाच शेतकºयांची अधिक मागणी होत आहे. परंतु नेमके युरीयाचीच टंचाई भासत आहे. वरिष्ठ पातळीवरून युरीया पुरेसे येत नसल्यामुळे शेतकºयांचीही पंचाईत झाली आहे.
कृषी प्रतिष्ठानांकडून युरीयाबरोबर इतर रासायनिक खते घेण्याची शक्ती केली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. नाईलाजास्तव शेतकºयांना इतर खतेही घ्यावे लागत आहे. परिणामी शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची व्यथा शेतकºयांनी बोलून दाखविली आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे केळी, पपई, कापूस या नगदी पिकांच्या असलेल्या भावामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यातून आकसे बसे सावरत शेतकरी पुन्हा खरीप हंगामाला लागून आपली एकाग्रता पिकाकडे लावली आहे. निदान शासनाने रासायनिक खते तरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. एवढेच नव्हे शेतकºयांची मालकीची असलेली तालुका खरेदी-विक्री संघाने मागणी करूनही या संस्थेला युरीयाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करून देण्यात येत नाही. येथे युरीया उपलब्ध झाले तर शेतकºयांना स्वस्तात खते उपलब्ध होतील. येथील ग्रामपंचायतीनेही दुकानदारांकडून अधिक दराने खते विकून शेतकºयांची आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रासायनिक खते घेण्यासाठी कृषी दुकानांवर शेतकºयांच्या अक्षरश: रांगा लागल्याने कोरोना महामारीच्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. कारण उभे राहणाºया शेतकºयांमध्ये कधीच अंतर राखले जात नाही. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापराबाबत पोलीस प्रशासन इतरांवर कारवाई करीत आहेत. प्रतिष्ठानांवर लागलेल्या रांगांबाबत का? ठोस कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.