कर्जमुक्तीच्या याद्या तातडीने तयार कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:42 PM2020-01-23T12:42:27+5:302020-01-23T12:42:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पात्र लाभार्थी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास प्राधान्य द्यावे. राज्यात सर्वप्रथम नंदुरबारच्या शेतकºयांना योजनेचा लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक, सहाय्यक निबंधक निरज चौधरी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकºयांना देण्यासाठी योजनेची माहिती असलेले मोठ-मोठे बॅनर्स तयार करुन शासकीय कार्यालय तसेच वर्दळीच्या ठिकाणी लावावे. सर्व सेवा केंद्रावरील बायोमॅट्रीक मशिन, संगणक यंत्रणा सुरळीत असाव्यात. योजनेविषयी माहिती भरतांना येणाºया अडचणी समन्वयाने सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांचे तालुकानिहाय व्हॉट्सअ्प ग्रृप तयार करावेत. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या प्रशिक्षण साहित्याचा अभ्यास करुन माहिती भरावी.
केंद्र चालकांना संगणक प्रणालीमध्ये लॉगिन सुविधा दिली जाणार असून आधार प्रमाणिकरण झालेल्या याद्या पोर्टलवरुन डाऊनलोड करुन छपाई करुन गावांमध्ये प्रसिद्ध कराव्यात. सेवा केंद्रावर आलेल्या शेतकºयास प्रक्रियेबाबत माहिती द्यावी आणि आधार क्रमांक, विशिष्ट क्रमांक, सहमत किंवा असहमत असणे या बाबी समजून सांगाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. चाळक यांनी आधारलिंक, नवीन आधार व आधार प्रमाणिकरणाबाबत माहिती दिली. खैरनार यांनी संगणक प्रणालीबाबत माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
शेतकरी कर्ज योजनेची पुरेशी माहिती संबधितांकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. लाभ मिळतो की नाही, मिळालाच तर त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल यासह विविध प्रश्न आणि समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर याबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.