तळोद्यात एक क्विंटल प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:14 PM2018-06-09T13:14:08+5:302018-06-09T13:14:08+5:30
पालिकेची कारवाई : चार व्यापा:यांना 20 हजारांचा दंड
तळोदा : प्लास्टिक पिशाव्य व वस्तू विक्री बाबत सातत्याने सूचना देवून ही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या विक्री केली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर येथील पालिका प्रशासनाने अचानक व्यावसायिक प्रतिष्ठांवर धाडी टाकून त्यांच्या कडील एक क्विंटल प्लास्टिकच्या वस्तू व पिशाव्य जप्त केल्या. शिवाय या चार ही व्यापा:यांवर 20 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली. पालिकेने अचानक धाडी टाकल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र यात पालिकेने सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे जनजागृती बरोबरच विक्री बाबत व्यावसायिकांना सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. शिवाय काही दिवसाच्या पूर्वी व्यापा:यांकडून कॅरी बैग सुध्दा जप्त केल्या आहेत, असे असताना प्लास्टिक पिशाव्य व वस्तुंची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची माहिती पालिकेस मिळाली होती. त्यानुसार पालिकेने गुरुवारी अचानक धाड टाकली. सुरुवतीस पालिकेने आपल्या कर्मचा:यास ग्राहक म्हणून एका दुकानात पाठविले तेथे प्लास्टिकच्या वस्तू मागीतल्या असता या दुकान मालकाने वस्तू देताच इतरांनी धाड टाकली. अशाच प्रकारे इतर व्यापा:यांकडेही धाडी टाकून त्यांच्याकडून प्लास्टिक वस्तू व पिशाव्य जप्त करण्यात आल्या.
श्रीकृष्ण स्टोर्स, जय बालाजी, रामदेव किराणा, राधा कृष्ण किराणा अशा चार दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या. या व्यावसायिकांकडून एक क्विंटल प्लास्टिकच्या वस्तू जप्त करुण साधारण 20 हजराची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई स्वत: मुख्याधिकारी जनार्दन पवार, कार्यालय अधीक्षक राजेंद्र सैंदाणे, विजय सोनावणे, राजेंद्र माळी, मोहन माळी, प्रशांत ठाकूर, मनोज परदेशी यांनी केली.
दरम्यान जप्त केलेल्या प्लास्टिकच्या वस्तुंची स्वर्ग रथात प्रेतयात्रा काढून पालिकेच्या कचरा डिपोत त्याचे दहन करण्यात आले.