नंदुरबारातील ‘रब्बी’ला हवे 14 हजार मेट्रिक टन खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:34 PM2018-01-12T12:34:41+5:302018-01-12T12:34:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े
जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गरज वाढली आह़े यासाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या परवानाधारक पुरवठादारांना कृषी विभागाकडून नियंत्रित दरांमध्ये खतांचा पुरवठा करण्यात येतो़ यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी केंद्रीय कृषी विभागाकडे 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली आह़े मात्र हे खत अद्यापही जिल्ह्यास प्राप्त झालेले नाही़ शेतक:यांना खताची टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने खरीप हंगामात विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या रासायनिक खताचे योग्य ते नियोजन करून शेतक:यांना उपलब्ध करून दिले आह़े यामुळे शेतक:यांची शेतीकामे सुरळीत सुरू आहेत़ दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अधिकृत रासायनिक खत विक्रेते हे 570 आहेत़ या विक्रेत्यांकडे खतांसाठी शेतक:यांनी नोंदण्या करून ठेवल्या होत्या़ मात्र रब्बी हंगामाला सुरूवात होऊनही खतांचा रॅक न आल्याने विक्रेत्यांनी शिल्लक असलेल्या खतांची विक्री चालवली आह़े यात गेल्या काही वर्षात झालेल्या नोटाबंदीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते यांच्या व्यवहारांवर परिणाम झाले होत़े त्यावर पर्याय काढत गेल्यावेळी पीओएस मशिन्सचे वाटप करण्यात आले होत़े यानुसार जिल्ह्यात आजही 160 ठिकाणी पीओएसद्वारे खत आणि बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतक:यांनाही सोयीचे झाले आह़े शेतक:यांकडे असलेले एटीएमकार्ड तसेच इतर कार्डच्या माध्यमातून खतांचे बिल देण्याची व्यवस्था झाल्याने काहीअंशी व्यवहार सुरळीत झाले आहेत़
जिल्ह्यात खतांची टंचाई होऊ नये यासाठी खरीप हंगामात 60 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक खतांची आवक केली गेली होती़ वेळोवळी यात वाढ झाल्याने रब्बी हंगामासाठी 11 हजार मेट्रिक टन खते विक्रेत्यांकडे पडून होती़ खतांची आवक लांबल्यानंतर ही खते कामी आली आहेत़ यंदाबियाण्यांचीही प्रमाणात विक्री झाली होती़