Vidhan Sabha 2019 : रघुवंशींसह समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:36 AM2019-10-03T11:36:30+5:302019-10-03T11:44:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका:यांनी बुधवारी दुपारी ...

Raghuvanshi supporters join Shiv Sena | Vidhan Sabha 2019 : रघुवंशींसह समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Vidhan Sabha 2019 : रघुवंशींसह समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका:यांनी बुधवारी दुपारी मातोश्रीवर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, अक्कलकुवा राज्याचा पहिला मतदारसंघ असल्याने तेथूनच शिवसेनेच्या विजयाची घौडदौड सुरू करण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ठरल्याप्रमाणे बुधवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी तीन वाजता त्यांचे वर्चस्व असलेल्या नंदुरबार पालिकेतील नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व काँग्रेसचे सर्व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक, शेतकरी सहकारी संघाचे सभापती व सर्व संचालक याशिवाय त्यांचे पूत्र राम रघुवंशी, माजी पंचायत समिती सभापती, सदस्य यांनी देखील शिवबंधन बांधले. 
गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते तथा गेल्या निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघात दुस:या क्रमांकावर राहिलेले विजयसिंग पराडके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील यावेळी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. 
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले, चंद्रकांत रघुवंशी यांचा काँग्रेसमध्ये जो सन्मान होता तो शिवसेनेत कायम राहिल.      विजयाची घौडदौड अक्कलकुवापासून सुरू करायची आहे. त्यामुळे तेथून राज्यात सर्वत्र भगवे वादळ निर्माण करा. विकास कामांच्या उद्घाटनासाठी आपण लवकरच नंदुरबारात येणार असल्याचे त्यांनी यावेळी कार्यकत्र्याना संबोधीत करतांना सांगितले. 
यावेळी शिवेसनेच्या नेत्या आमदार निलम गो:हे, सचिव मिलींद नाव्रेकर, संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यासह सेनेचे नेते उपस्थित होते.  जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी, माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसमधून शिवसेनेत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका:यांनी प्रवेश केल्याने आता नंदुरबार पालिका, शेतकरी सहकारी संघटना, कृषी उत्पन्न बाजार समिती या व इतर संस्था शिवसेनेच्या वर्चस्वाखाली आल्या आहेत. परिणामी नंदुरबार शहर व तालुक्यात काँग्रेस अस्तित्वहीन झाली आहे. पदाधिकारी व कार्यकर्तेच या पक्षात उरले नसल्याचे चित्र आहे. 

आमदार विजयकुमार गावीत यांचे खंदे समर्थक विजयसिंग पराडके यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. हे दोन्ही नेत्यांनी भाजपकडे तिकिटाचीही मागणी केली होती. परंतु अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने या नेत्यांचा हिरमोड झाला. परिणामी चंद्रकांत रघुवंशी यांची साथ धरत या नेत्यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: Raghuvanshi supporters join Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.