रेल्वे प्रवाशांची होते आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:09 AM2020-09-17T11:09:35+5:302020-09-17T11:09:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना काळात रेल्वे स्थानकावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. येणाऱ्या सर्व प्रवाशांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना काळात रेल्वे स्थानकावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. येणाऱ्या सर्व प्रवाशांची तापाची तपासणी करून त्यांची नोंद घेतली जात आहे. सद्या या मार्गावर प्रवासी रेल्वे कमी असल्यामुळे फारशी गर्दी राहत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना काळात रेल्वे स्थानकावर पहिल्यापासूनच आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकात शुकशुकाट राहत असला तरी मालगाड्या व विशेष गाड्या सुरू होत्या. त्यामुळे जंतूनाशक फवारणी करून आवश्यक त्या सवर उपाययोजना करण्यात येत होत्या.
स्थानकावरून एप्रिल व मे महिन्यात आठ विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून विद्यार्थी, मजूर यांना उत्तर भारत, पूर्व भारतात पाठविण्यात आले. त्यावेळी देखील सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाईज करण्यात आले.
जून महिन्यापासून काही प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्यानंतर या मार्गावरूनही गाड्या धावू लागल्या. त्यामुळे आता कोरोनाच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना या ठिकाणी केल्या जात आहेत. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोन कर्मचाऱ्यांची त्यासाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. एक कर्मचारी येणाºया व स्थानकातून बाहेर जाणाºया प्रत्येक प्रवाशाच्या शरिराचे तापमान मोजतो. दुसरा कर्मचारी प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटाचा पॅन नंबर, तो जाणार असलेल्या ठिकाणाचा पत्ता, त्याचा स्थानिक पत्ता व तपासलेल्या शाररिक तापमानाची नोंद घेत असतो.
सद्या प्रवासी संख्या कमी असल्यामुळे या कर्मचाºयांवर फारसा ताण नाही. परंतु जेंव्हा प्रवासी संख्या वाढेल त्यावेळी आणखी कर्मचारी संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
याशिवाय स्थानकात वेळोवेळी सॅनिटाईज केले जाते. प्रवाशांना बसायचे बाक, तिकीट खिडकी, पादचारी पुलाची रेलींग, प्रतिक्षालय, पाणपोई, स्वच्छतागृह या ठिकाणी स्वच्छता करून सॅनिटाईज करण्यात येते. यासाठी वरिष्ठ अधिकारी नियमित या कामांवर लक्ष देऊन आहेत. रेल्वेच्या या उपाययोजनांमुळे प्रवाशांंमध्ये देखील समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.