रेल्वे बोगदा : असून अडचण, नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:59 AM2019-05-26T11:59:41+5:302019-05-26T11:59:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी ...

Railway tunnel: There is no difficulty, but detention | रेल्वे बोगदा : असून अडचण, नसून खोळंबा

रेल्वे बोगदा : असून अडचण, नसून खोळंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी अभावी ते धूळखात पडून आहेत. राजकीय श्रेयाचा वादात हे बोगदे अडकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहरवासीयांच्या अडचणीचा विचार करून या कामाला प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे. 
उड्डाणपुलावरील वाहतुकीची मर्यादा लक्षात घेता अनेक वाहनचालक नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचा वापर करतात. परंतु या ठिकाणच्या अडचणींमुळे वाहनचालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते. शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु दहा वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याद्वारे देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. परंतु निधी मंजुर होताच निवडणुका लागल्या आणि भाजप सरकार सत्तेत आले. नंतर बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर संबधीत ठेकेदाराने या बोगद्यांचे काम अत्याधुनिक पद्धतीने केले. काम पुर्ण होऊन वर्ष लोटले आहे. परंतु बोगदे त्यांच्या जागी अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  नसून अडचण व असून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. यासंदर्भात गांभिर्याने घेवून दोन्ही बोगदे बसविण्यात येवून कार्यान्वीत करावे, अशी मागणी आहे. 

Web Title: Railway tunnel: There is no difficulty, but detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.