जग्मा स्कुलतर्फे रेन्बो कला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:33 PM2019-11-30T13:33:59+5:302019-11-30T13:34:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विद्याथ्र्यामधील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जग्मा वर्ल्ड स्कुल खेडदिगर ता.शहादा येथे रन्बो कला स्पर्धा घेण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : विद्याथ्र्यामधील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जग्मा वर्ल्ड स्कुल खेडदिगर ता.शहादा येथे रन्बो कला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 300 विद्याथ्र्यानी सहभाग घेतला.
विहाना फाऊंडेशन व जग्मा स्कुलतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या स्पर्धेत सर्व माध्यमातील विद्याथ्र्यानी सहभाग घेतला असून यात चित्रकला, रांगोळी व क्रॉप्ट अशा कलांचा समावेश होता. विद्याथ्र्यानी आपापल्या परिने आकर्षक कला साकारण्याचा प्रय} केला. त्यातून प्रथम बक्षीस डिजीटल लॅब, द्वितीय डिजीटल वॉच तर तृतीय बक्षस डिजीटल रायटिंग पॅड या कलेला देण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी शहाद्याचे तहसिलदार मिलींद कुलकर्णी, कंचन पाटील, माधवी पाटील, जगदिश पाटील, मायाबाई पाटील, डॉ.महेंद्र चौधरी, डॉ.महेंद्र चौधरी, हर्षल पटेल, मनोहर चौधरी, रोहिदास पाटील, शेहजाद, प्रशांत अग्रवाल, प्रकाश जैन, युवराज बागुल, यशवंत जैन, प्रतिक पाटील, सुनिल चौधरी, धिरज गुप्ता, उपाध्याय, प्रकाश चांडक आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट कला सादर करणा:या विद्याथ्र्याना उपस्थित पालकांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या उपक्रमासाठी जग्मा स्कूलचे अध्यक्ष डॉ.प्रियांक पाटील, सचिव मोनालिसा पाटील यांनी मार्गदर्शन केले असून संस्थेचे व्यवस्थापक प्रा.शरद पटेल यांनी या उपक्रमाची संपूर्ण रुपरेषा तयार केली. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.