पूर्व भागात पावसाची प्रतिक्षा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:01 PM2017-08-11T16:01:34+5:302017-08-11T16:02:19+5:30
Next
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने येथील शेतक:यांना अजून पावसाची प्रतिक्षा आह़े पावसाने उघडीप घेतली असल्याने शेतकरी तोवर इतर मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देत आहेत़ पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक असल्याने श्रावणधारा कधी कोसळता नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, भालेर, न्याहली, धानोरा, कोठली आदी परिसरात गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आह़े त्यामुळे शेतक:यांना पिकांची चिंता लागून आह़े पावसाचे दोन महिने उलटले आल़े परंतु या दोन महिन्यात एक-दोन अपवाद वगळता इतर काळ हा कोरडाच गेला असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े पाऊस नसल्याने परिसरातील नद्या नालेदेखील कोरडे पडत आहेत़ त्यामुळे ऐन श्रावणमासात शेतक:यांना पाण्याची विवंचना करावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े पावसाळा असूनही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळी खालावली आह़े काही विहिरी तर कोरडय़ाठाक पडल्या आहेत़ दोन महिन्यांपासून दमदार पावसाअभावी कापूस, मिरची, मका, कांदा आदी पिकं पुर्ण क्षमतेने येण्याची शाश्वती कमी झाली आह़े त्यामुळे पिकावर पावसाअभावी संक्रांत ओढावली असल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आह़े गेल्या काही दिवसांपासून शनिमांडळ व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण आह़े त्यामुळे याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पिकांची वाढ खुंटली असून येत्या काही दिवसात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास पिकं करपण्या धोकाही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना पिकांसाठी पोटाला चिमटा काढून तसेच विविध ठिकाणाहून कर्जाचा बोजा करुन खत बि-बियाणे आदींवर हजारो रुपये खर्च केली आहेत़ त्यामुळे साहजीकच शेतक:यांचे संपूर्ण आर्थिक गणित हे यापासून निघणा:या उत्पन्नावर आह़े परंतु पावसाने पाठ फिरवल्यो शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याची स्थिती निर्माण झाली आह़े दरम्यान, मुग, उडीद चवळी आदी पिकांची स्थितीदेखील काही वेगळी नाही़ ही पिके ऐन फुलो:यावर असून पाण्याची गरज आह़े येत्या चार पाच दिवसात पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आह़े