अक्कलकुवासह दोन मंडळात अतिवृष्टी पावसाची रिपरिप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:10 PM2018-07-22T13:10:40+5:302018-07-22T13:10:48+5:30
दुर्गम भागात दरडी कोसळल्याने रस्ते बंद
नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यासह दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात 98 तर सोमवार व विसरवाडी मंडळात अनुक्रमे 71 व 70 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अक्कलकुवा ते कंकाळामाळ दरम्यान दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, तळोदा व नवापूर तालुक्यात दुस:या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. गेल्या 24 तासात एकुण सरासरीचा 32 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद आहे. तालुक्यात एकुण 98 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. तर तळोदा तालुक्यातील सोमावल मंडळात 71 तर नवापूर तालुक्यातील विसरवाडी मंडळात 70 मि.मी.पाऊस 24 तासात नोंद करण्यात आला.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक घाट रस्त्यांवर दरड कोसळून रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. कंकाळामाळ ते अक्कलकुवा रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता शनिवारी वाहतुकीसाठी बंद झाला होता. कंकालामाळ, कोराई, सिन्धीपाडा, खाई, ओहवा, कुवा, कटासखाई, उखलीआंबीपाडा या ठिकाणच्या ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले.
तसेच कौलवी ते कोलवीमाळ या रस्त्यावर देखील शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याने या रस्त्यावरील बोडीपाडा, पाटीलपाडा, केलीपाडा, देवपाडा या परिसरातील वाहनधारकांना गैरसोयीचे झाले.
गोरजाबारी ते खाई या दरम्यान देखील शुक्रवारी रस्त्यावर दरड कोसळली आहे.
त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. प्रशासनाची वाट न पहाता नागरिकांनीच रस्त्यावरील दरड हटविण्याचा प्रय} केला होता.