जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी लागवडीला अतीवृष्टीची ‘नाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:52 AM2019-08-26T11:52:08+5:302019-08-26T11:52:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार वर्षानंतर सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात कापूस लागवड होऊनही असून 115 टक्के कापूस लागवड पावसामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चार वर्षानंतर सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात कापूस लागवड होऊनही असून 115 टक्के कापूस लागवड पावसामुळे 25 टक्के क्षेत्र नुकसानीच्या गर्तेत सापडले आह़े यामुळे शेतक:यांच्या उत्पादनातही घट येण्याची चिन्हे आहेत़ यंदा दुबारचे संकट टळल्याने शेतक:यांसाठी आशादायी वातावरण निर्माण झाले होत़े परंतू पावसामुळे पिकाला फटका बसला आह़े
जिल्ह्यात 2014 पासून कापूस उत्पादनाची स्थिती यथातथाच राहिली आह़े साधारण 1 लाख 10 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आल्यानंतर त्यातून प्रती हेक्टर सरासरी 212 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांच्या पदरी पडले आह़े 2014 ते 2018 या कालावधीत पावसाची स्थिती ही असमाधानकारक असल्याने शेतक:यांना दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले होत़े यंदाच्या हंगामात आतार्पयत 95 टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतू लागवडीच्या 25 टक्के क्षेत्रात थेट आणि उर्वरित क्षेत्रात अतीवृष्टीचा फटका बसल्याचे परिणाम आता समोर येत आहेत़ यामुळे शेतकरी यंदा कापसाचे विक्रमी घेण्यापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत़ यातून शेतक:यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आह़े
जिल््ह्यात यंदा 1 हजार 6 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होणार असे निर्धारण कृषी विभागाने केले होत़े गत चार वर्षातील उत्पादन आणि क्षेत्र यामुळे यंदाच्या क्षेत्राबाबत साशंकता होती़ परंतू उशिराने का होईना पावसाने पूर्ण क्षमतेने हजेरी दिल्याने 1 लाख 22 हजार 895 हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली होती़ यात नंदुरबार 37 हजार 505, नवापुर 9 हजार 630, शहादा 50 हजार 922, तळोदा 9 हजार 798, धडगाव 9 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली़ दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कापूस पिकाची वाताहत झाली आह़े कमी उंचीची झाडे सात दिवसांर्पयत पाण्यात राहिल्याने त्यांना मर आला होता़ तर काही ठिकाणी जमिनीवरुन पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास पिकांची स्थिती नाजूक झाली आह़े शहादा तालुक्यात कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती असून नंदुरबार तालुक्यातही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होत़े यामुळे या गावांमधील शेतक:यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याची मागणी आह़े प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 20 हजार हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज असला तरी 30 हजार हेक्टर कापूस पाण्यात गेल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े
जिल्ह्यात प्रती हेक्टर सरासरी 212 किलो ग्रॅम कापूस उत्पादन घेतले जाते 2014 ते 2018 यादरम्यान उत्पादनात चढ उतार कायम राहिले आहेत़ 2014 मध्ये 1 लाख 18 हजार क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाचे उत्पादन हे 1 लाख 12 हजार टन एवढे होत़े प्रती हेक्टर 145 किलोग्रॅम उत्पादन घेतले गेल़े
2015 मध्ये 1 लाख 16 हजार हेक्टरवरील कापसाचे उत्पादन 1 लाख 106 टन एवढे होत़े हेक्टरी 161 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांना आल़े
2016 या वर्षात 80 हजार हेक्टरवरील कापसाचे 1 लाख 521 टन उत्पादन आले होत़े प्रती हेक्टरी उत्पादकता होती 303 हेक्टऱ
2017 मध्ये प्रती हेक्टर 338 किलोग्रॅम तर 2018 मधील 1 लाख 18 हजार हेक्टरवरील कापसाचे प्रती हेक्टर 267 किलोग्रॅम उत्पादन आले होत़े