जिल्ह्यावर बरसली आभाळमाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:10 PM2019-08-05T12:10:09+5:302019-08-05T12:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाल़े तळोदा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाल़े तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, शहादा, नवापुर आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात तब्बल 12 तासांपेक्षा अधिक काळ पाऊस सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आह़े तळोद्यात खर्डी नदीची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठावरच्या घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांची धावपळ उडाली़ तळोदा तालुक्यातील रोझवा, त:हावद आणि मोड पुनर्वसन वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील बाधितांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल़े पावसामुळे धडगाव तालुक्यातील नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान केल़े पावसामुळे नवापुर, नंदुरबार व शहादा तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत़ एकीकडे पावसामुळे नुकसान होत असले तरी गावोगावी दीर्घकाळानंतर आलेल्या पाण्याचे पूजन करुन स्वागत करण्यात आल़े
जावदे तर्फे बोरदची शाळा पाण्यात : शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद येथे अतीवृष्टीमुळे नाल्याला पूर येऊन गावात पाणी तुंबल़े यातून गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाल़े गावासोबत नाल्याचे पाणी जावदे तर्फे बोरद आणि कुढावद शिवारातही शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आह़े पाण्याचे लोंढे घरात जात असल्याने ग्रामस्थांचे पहाटेपासून हाल सुरु होत़े
सातपुडय़ात संततधार पाऊस सुरु असल्याने सुसरी नदीला मोठय़ा प्रतिक्षेनंतर पूर आला़ यामुळे आनंदीत झालेल्या ब्राrाणपुरी ता़ शहादा येथील ग्रामस्थांनी सुसरी नदीचे जलपूजन करण्यात आल़े
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनवर्सन वसाहतीत पाणी गेल्याने बाधितांचे हाल झाल़े शंकर चापडू पावरा, दिनेश जहांगीर पावरा, रेल्या भुज्र्या तडवी, निंबा नामदेव गवळी यांच्यासह इतर बाधितांचे नुकसान झाल़े
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील अमरावती नदीला दशकभरानंतर पुर आला़ पुराचे खळाळते पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़ खर्दे खुर्द, वैंदाणेसह विविध गावात घरांची पडझड झाली आह़े
शहादा तालुक्यातील कन्हेरी नदीला आलेल्या पुरामुळे पिंप्री, म्हसावद येथील ग्रामस्थांना फटका बसला़ म्हसावद येथील 200 घरे बाधित झाली़ सोनवद त़बो़ येथेही पूरस्थिती आह़े शहाद्यातील मोहिदा रस्त्यावरील भेंडवा नाल्याला पाणी आल्याने मोहिद्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली़ नाल्याचे पाणी रात्रीर्पयत ‘जैसे थे’ होत़े