नंदुरबारातून विजयकुमार गावीत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:18 AM2019-10-24T10:18:00+5:302019-10-24T10:20:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदारसंघातील 26 उमेदवारांसाठी मतदारांनी दिलेल्या मतदानाची मोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु करण्यात ...

Raise four constituencies in Nandurbar district | नंदुरबारातून विजयकुमार गावीत आघाडीवर

नंदुरबारातून विजयकुमार गावीत आघाडीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदारसंघातील 26 उमेदवारांसाठी मतदारांनी दिलेल्या मतदानाची मोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु करण्यात आली़ यात नंदुरबारचे विद्यमान आमदार भाजपचे डॉ़ विजयकुमार गावीत यांची पहिल्या फेरीपासून विजयी घोडदौड सुरु होती़ 
शहाद्यात काँग्रेसचे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी व भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांच्यात चुरस सुरु होती़ याठिकाणी राजेश पाडवी हे पाच हजार मतांनी पुढे आहेत़ 
 नवापुर मतदारसंघात अपक्ष शरद गावीत व काँग्रेसचे शिरीष नाईक यांच्या सरळ सामना सुरु असून भाजपाचे भरत गावीत हे दोघांपेक्षाही निम्म्या मतांनी मागे आहेत़ 
अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे आमशा पाडवी व काँग्रेसचे विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांच्यातील चढाओढ लक्षवेधी ठरत आह़े सकाळी 10 वाजेर्पयत सर्व मतदारसंघातील 10 फे:या पूर्ण झाल्या आहेत़ 
नंदुरबाऱ 
 सकाळी आठ वाजेपासून सुरु झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी आघाडी घेतली़ पोस्टल मतदानात विजयकुमार गावीत पुढे होत़े डॉ़ गावीत यांना पहिल्या फेरीत 3 हजार 200 मतांची आघाडी मिळाली़ तिस:या फेरी अखेर आमदार डॉ़ गावीत यांना 10 हजार मतांचा लीड मिळाला़ चौथ्याफेरीअखेर नंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 14 हजार मतांनी आघाडीवर होत़े सातव्या फेरीअंती विजयकुमार गावीत भाजप 17500 मतांनी आघाडीवर आहेत़ 
नवापुर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नवापुर मतदारसंघात कॉग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिष नाईक यांना पहिल्या फेरीपासून 2 हजार 51 मतांचा लीड मिळाला़ तिस:या फेरीत भाजपा भरत गावित-1951, कॉग्रेस शिरिषकुमार नाईक-3185, अपक्ष शरद गावित यांना 2707 मते मिळाली आहेत़ चौथ्या फेरीअखेर शिरीष नाईक 6000 मतांनी आघाडीवऱ पाचव्या फेरीत नवापुर मतदारसंघात भाजपा भरत गावित-9650, कॉग्रेस शिरिषकुमार नाईक-18451, अपक्ष शरद गावित-13743, सहाव्या फेरीत भाजपा भरत गावित-9982, कॉग्रेस शिरिषकुमार नाईक-20938, अपक्ष शरद गावित-18385, काँग्रेसचे शिरीष नाईक आघाडीवऱ फेरीच्या शेवटी आघाडीवर असलेला उमेदवार: शिरीष नाईक- 624 आघाडीनंदुरबार- विजयकुमार गावीत भाजप 20 हजार पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर.आठव्या फेरीअखेर भाजपा भरत गावित-12106, कॉग्रेस शिरिषकुमार नाईक-27456, अपक्ष शरद गावित-27249, शिरीष नाईक- काँग्रेस: 24090, भरत गावीत - भाजपा: 10755, शरद गावीत - अपक्ष 23466, 
शहादा़ 
शहाद्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी हे आघाडीवर होत़े  कॉग्रेसचे पद्माकर वळवी  4 हजार 616 मतांनी आघाडीवर.  चौथ्या फेरीअखेर पद्माकर वळवी कॉग्रेस 2600 मतांनी आघाडीवर. शहादा- पद्माकर वळवी कॉग्रेस 3200 मतांनी आघाडीवऱ तिस:या फेरीअखेर कॉग्रेस 4708 मतांनी आघाडीवर.पदमाकर वळवी- काँग्रेस: 3830, जयसिंग माळी- माकप: 99, राजेश पाडवी- भाजपा: 3138, जैलसिंग पावरा- अपक्ष: 319, नोटा: 144, शहाद्यात चौथ्या फेरीअखेर पदमाकर वळवी- काँग्रेस: 3208, जयसिंग माळी- माकप: 126, राजेश पाडवी- भाजपा: 3939, जैलसिंग पावरा- अपक्ष: 1889, नोटा: 169, फेरीच्या शेवटी आघाडीवर पदमाकर वळवी- 2589 यांना आघाडी, सातव्या फेरीत अखेर मिळालेली  पदमाकर वळवी (काँग्रेस)- 15685, राजेश पाडवी (भाजप)- 13096 , मतांनी आघाडीवर-207, सातवी फेरी, पदमाकर वळवी- काँग्रेस: 24564, जयसिंग माळी- माकप: 1019, राजेश पाडवी- भाजपा: 23680, जैलसिंग पावरा- अपक्ष: 11111, नोटा: 1248 फेरीच्या शेवटी काँग्रेसचे पदमाकर वळवी- 884 आघाडी 

अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी पहिल्या फेरीत 500 मतांची आघाडी घेतली़ विद्यमान आमदार क़ेसी़पाडवी पहिल्या फेरीत पिछाडीवऱ दुस:या फेरीत अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे अॅड़़क़ेपाडवी हे600 मतांनी आघाडीवर आहेत़ अक्कलकुवा चौथ्या फेरीअखेर आमश्या पाडवी (शिवसेना) 12376, के सी पाडवी (काँग्रेस) 12875, नागेश पाडवी (अपक्ष) 1955, विद्यमान आमदार के सी पाडवी (काँग्रेस) 499 मतानी पुढे होत़े 
 

Web Title: Raise four constituencies in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.