आरक्षणासाठी मुस्लीम समाजातर्फे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:42 PM2018-11-24T12:42:12+5:302018-11-24T12:42:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जमियते उलेमा ए हिंद तर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जमियते उलेमा ए हिंद तर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदनही देण्यात आले. आंदोलनात मोठय़ा संख्येने मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते.
शासकीय, निमशासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, 2014 मध्ये पाच टक्के आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर ते टिकले नाही. उच्च न्यायालयाने आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय दिला होता. असे असतांनाही मुस्लिम आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाहू महाराज, तत्कालीन बॉम्बे सरकार यांनीही मुस्लिम समाजाला मागासवर्ग म्हणून घोषीत केले होते. सच्चर समितीच्या अहवालात देखील अनेक उल्लेख आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण देण्याबाबत न्याय निवाडा दिला आहे. त्यामुळे विशेष मागास प्रवर्ग अ या अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जमिअत उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष मौलाना जकरिया रहेमानी, मौलाना जावीद सादोरी, मौलाना हाफिज अ. कादिर, मौलवी आरिफ रहमानी, मौलवी वसीम बागवान, मौलाना हुजेफा ईशाअती, मौलाना झुल्फिकार, नगरसेवक परवेज खान, एजाज बागवान, मुफ्ती ईमरान, मुक्ति उसामा, हाफिज फरहान, हाजी इरफान मेमन, सैय्यद नसिर अली, सलीम लोहार, सलीम बागवान, इस्माईल मंसुरी, जमाल खाटीक, ईमरान मेमन,अ. कादिर मिया,मिजान, सैय्यद इसरार अली, आरिफ कमर शेख,शे. सादिक, सैय्यद सज्जाद, साकिब अंवर, फिरोज मिस्तरी, नवाज काझी, साजीद पठाण कुरेशी, वसीम धोबी, सैय्यद अबरार अली, एजाज पठाण, साजिद सैय्यद, जुबेर मनियार, महेमुद मिस्त्री, अ. माजिद टेलर, वसीम खान, डॉ. अब्दुल मतीन अकील शेख, मुस्तफा चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आहेत.