राजा बोले दल हाले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 05:12 PM2017-07-18T17:12:51+5:302017-07-18T17:12:51+5:30
मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर नंदुरबार जिल्हाधिका:यांनी भरले वैद्यकीय अधिका:यांची 29 रिक्त पदे
Next
संतोष सूर्यवंशी/ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.18 - आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त जागांबाबत दौ:याच्या वेळी मुख्यमंत्र्यांकडे गा:हाणी मांडण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी रिक्त जागा भरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याने तत्काळ वैद्यकीय अधिका:यांची ‘29 रिक्तपदे भरल्याने राजा बोले दल हाले..’ ही अनुभूती नंदुरबारकरांना आली.
राज्यात पहिल्यांदाच एवढय़ा त्वरेने वैद्यकीय अधिकारी दर्जाच्या जागा भरण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्याकडून सांगण्यात येत आह़े मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे जिल्हा प्रशासनानेही त्वरीत मनावर घेऊन पदभरती केल्याने समाधान व्यक्त होत आह़े तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या इतरही रिक्त जागा अशाच पध्दतीने त्वरीत भराव्या अशी मागणी करण्यात येत आह़े
अक्कलकुवा, धडगाव येथे तब्बल 29 वैद्यकीय अधिका:यांच्या जागा रिक्त होत्या़ आधीच जिल्ह्यातील दुर्गम भाग असल्याने येथे आरोग्य व्यवस्था कोलमडलेली होती़ तसेच रिक्त जागांची समस्यादेखील कायम होती़ त्यामुळे सर्वच ठिकाणी आनंदी आनंद होता़ 17 मे रोजी जिल्ह्यातील मोलगी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने आरोग्य विभागाकडून रिक्त जागांची समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचण्यात आला होता़ आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथील दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यचा प्रश्न गंभीर आह़े तसेच रिक्त जागा वर्षानुवर्षे भरली जात नसल्याने अजून किती दिवस येथील ग्रामस्थांनी आरोग्याच्या प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे हादेखील मुद्दा होताच़ त्यामुळे यासर्वाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी टप्प्या-टप्प्याने येथील आरोग्य विभागाच्या जागा भरण्यात येतील असे आश्वासन दिले होत़े त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलेशट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन पदसंख्येबाबत जाहीरात देण्यात आली होती़ यात खुल्या पध्दतीने ही पदे भरण्यात आली. केवळ संबंधित पात्रतेची पूर्तता करुन कागदपत्रांची पाहणी करुन ही 29 पदे भरण्यात आली आहेत़
जिल्ह्यात अजूनही 290 पदे रिक्त
जिल्ह्यात एकूण 290 विविध पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ यात, आरोग्य सेवक पुरुष 77, आरोग्य सहाय्यक पुरुष 2, आरोग्य सहाय्यीका महिला 1, आरोग्य सेवक महिला 190, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 11, औषध निर्माण अधिकारी 7, आरोग्य पर्यवेक्षक 2 यांचा समावेश आह़े
एका महिन्यात 400 जागा भरणार - जिल्हाधिकारी
येत्या एक महिन्यात आरोग्य विभागाच्या 400 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ मलिनाथ कलशेट्टी यांनी लोकमतशी बोलताना दिली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलगी ता़ अक्कलकुवा दौ:यावर असताना जिल्हाधिकारी जागा भरण्याचे अधिकार दिले होत़े त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल व त्यावर जिल्हा प्रशासनाकडून झालेली त्वरीत कार्यवाही यामुळे हे शक्य झाल्याचे डॉ़ कशलेट्टी यांनी सांगितल़े
मुख्यमंत्री मोलगी दौ:यावर असताना त्यांच्या समोर आरोग्य विभागातील रिक्त पदांची समस्या मांडली होती़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना त्वरीत जागा भरण्याचे अधिकार दिले होत़े
-डॉ़ आऱ बी़ पवार
जिल्हा आरोग्य अधिकार