राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:02+5:302021-01-16T04:36:02+5:30
के.डी. गावीत विद्यालय, इसाईनगर नंदुरबार तालुक्यातील इसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी ...
के.डी. गावीत विद्यालय, इसाईनगर
नंदुरबार तालुक्यातील इसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.डी. पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून उपशिक्षक व्ही.एस. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपशिक्षक बी.जे. जावरे, एम.व्ही. वसावे, आर.पी. शाह, ए.डी. खेडकर, एम.आर. वसावे, ए.टी. नाईक, प्रा.जयाप्रती वसावे, प्रा.एस.आर. पाटील, सी.डी. जाधव, एम.डी. पेटकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.एन. पाटील, तर आभार एस.व्ही. विसपुते यांनी मानले.
महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.एच. पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ लिपिक एस.एस. भामरे, ग्रंथपाल एम.के. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात अल. यानंतर, मुख्याध्यापक डी.एच. पवार यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एस.ए. मंगळे तर आभार डी.बी. पावरा यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.