शिंदे येथे पाणी भरण्यासाठी रांगा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:16 PM2018-05-27T13:16:49+5:302018-05-27T13:16:49+5:30
ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 27 : नंदुरबारातील पूर्व भागात मोठी पाणीटंचाई जाणवू लागली आह़े यामुळे खरिप हंगाम धोक्यात येणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येने नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथे पाणी भरण्यासाठी शंभर मीटर्पयत रांगा लागत आहेत़
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, न्याहलीसह रनाळे, आसाणे, खोक्राळे, घाटाणे, बलदाणे, धारवड तसेच शिंदे, कोळदे, समशेरपूर, खोंडामळी आदी परिसरातील विहिरी तसेच कुपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आह़े त्यामुळे शेतक:यांना ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े
तालुक्यातील पूर्व भागात नेहमीप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंल्प होत़े त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या आधीपासून या ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होत़े या ठिकाणी रब्बी हंगामातसुध्दा पाण्याची टंचाई जाणवल्याने गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पीके अडचणी सापडली होती़ त्याच प्रमाणे आताच्या खरिप हंगामाचेही असेच काही होतेय की काय? असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़े
गेल्या वर्षीदेखील येथील शेतकरी पाण्याअभावी खरिप हंगाम पूर्ण क्षमतेने घेऊ शकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना जवळच्या धरणाचा आसरा घ्यावा लागत आह़े ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येसही तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़
इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना लोकप्रतिनिधीही याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणीटंचाईचा उद्भवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े
चा:यासाठीही होताय हाल.
दरम्यान, पाणीटंचाईचा सामना येथील पशुपालकांनादेखील सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े येथील पशुपालकांना चा:यासाठी इतरत्र वणवण करावी लागत आह़े
तालुक्यातील पश्चिमेकडील लहान शहादे, पिंपळोद, सुंदरदे आदी परिसरातून चा:याची तसेच ज्वारी, मका, कडबा आदींची आयात करण्यात येत आह़े परंतु त्या ठिकाणीसुध्दा आता हिरव्या चा:याची कमतरता जाणवू लागली असल्याने पशुपालकांची चांगलीच पंचायत होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े