सारंगखेडय़ात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:06 PM2018-12-23T13:06:32+5:302018-12-23T13:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने 150 पेक्षा अधीक जणांनी नवस ...

Range from the morning of the devotees for viewing in Sarangkhedaya | सारंगखेडय़ात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा

सारंगखेडय़ात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्ताने 150 पेक्षा अधीक जणांनी नवस फेडण्यासाठी तुला केली. दरम्यान, यात्रोत्सवानिमित्ताने भरण्यात येणारा अश्व बाजारही चांगलाच रंगात आला असून, सुमारे 2200 पेक्षा अधिक घोडे येथे विक्रीसाठी आले.
दत्त जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे पूजा अर्चा होवून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहिल्याच दिवशी 50 हजारापेक्षा अधीक भाविकांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती दत्त मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अजरुन पाटील, सचिव भिक्कन पाटील व उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.
पहाटे पंचामृत स्थान, उपहार दाखवून विधीवत पूजा करून दत्त मंदिर पहाटे तीन वाजेपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रात्री एक ते दीड वाजेपासूनच भाविकांनी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पहाटे तीन वाजेनंतर दर्शनाला सुरूवात झाल्यापासून महिला व पुरूषांच्या रांगा दिवसभर दर्शनासाठी सतत सुरू होत्या.
सारंगखेडा दत्त मंदिर परिसरात नवस फेडण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यात तुलेचा            नवस फेडण्यासाठीही भाविक मोठय़ा संख्येने मंदिर परिसरात होते. शनिवारी दीडशे तुला उतरविण्यात आल्या. यात गुळ, साखर, पेढे, केळी, सफरचंदच्या तुला करण्यात आल्या.
चौथा शनिवारी शासकीय सुटी असल्याने सकाळपासूनच दत्त            मंदिरात भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी दिसून आली. त्याच बरोबर यात्रेच्या दिवसी गावात गर्दी होती. अगदी 10 वाजेपासून यात्रेतील            मुख्य गल्ली, भांडी बाजार, मीना बाजार, खेळण्यांची दुकाने, हॉटेल्स फुल झाल्या होत्या. पालखीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी दाटली           होती.
यात्रोत्सवात परिसरातील पुसनद, शहादा, कहाटळ, कौठळ, कु:हावद, निमगुळ आदी परिसरातील भाविकांनी पायी येवून दत्त महाराजांचे दर्शन घेतले. या वेळी अनेक भाविक पायी नवस फेडण्याकरीता येतांना दिसून आले.

Web Title: Range from the morning of the devotees for viewing in Sarangkhedaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.