रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:34 PM2017-12-30T12:34:12+5:302017-12-30T12:34:17+5:30

RANGE OF POTTERIZATION: Prolapse of larva on gram flour | रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

रांझणी परिसर : हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह लगतच्या परिसरात हरभरा पिकावर पाने पोखरणा:या अळीचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील शेतक:यांकडून किटकनाशकाची फवारणी करण्यात येत आह़े
गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे असे हवामान अळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असत़े परिसरातीत शेकडो हेक्टरवर या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े 
या अळीच्या प्रादुर्भावाने हरभरा पिकाची वाढ खुंटते आह़े सोबतच पिकाची पाने या अळी पोखरत आहेत़ त्यामुळे ती पिवळीही पडत आहेत़ त्यामुळे पिक वाया जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत              आह़े 
ढगाळ हवामानाचा बसतोय फटका
गेल्या काही दिवसांपासून रांझणीसह रोझवा, रोझवा पुनर्वसन, जीवननगर तसेच प्रतापपूर परिसरात ढगाळ हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे सांगण्यात येत आह़े 
रब्बी पिकांना थंडीसह काही प्रमाणात सूर्यप्रकाशाचीही गरज असत़े परंतु या ठिकाणी पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांवर बुरशीजन्य आजार तर अळींचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत           आह़े 
रांझणीसह परिसरात या वर्षी शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आह़े त्याच प्रमाणे रोझवा लघुप्रकल्पांतर्गत सिंचनाखाली येणा:यांनीही हरभरा पिकाची पेरणी केली आह़े त्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पन्नावर अनेक शेतक:यांची आर्थिक गणित अवलंबून आह़े परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांच्या कष्टावर पाणी फेरण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आह़े 
अनेक शेतक:यांकडून  त्यांच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला नसतानाही भितीपोटी किटकनाशकांची फवारणी करण्यात येत असल्याचेही चित्र दिसत आह़े
 

Web Title: RANGE OF POTTERIZATION: Prolapse of larva on gram flour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.