स्वॅब पडताळणीत ‘रॅपिड अँटीजेन’चे यश ७० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:44 PM2020-07-27T12:44:23+5:302020-07-27T12:44:30+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टबद्दल प्रश्न ...

Rapid antigen success in swab verification is 70% | स्वॅब पडताळणीत ‘रॅपिड अँटीजेन’चे यश ७० टक्के

स्वॅब पडताळणीत ‘रॅपिड अँटीजेन’चे यश ७० टक्के

Next

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत़ अँटीजेनमध्ये आलेला अहवाल आरटी-पीसीआर टेस्टमध्ये बदलून येत असल्याचे प्रकार घडत आहेत़ काही क्षणात कोरोनाचे निदान करणाºया अँटीजेन चाचणीची नंदुरबार जिल्ह्यात मात्र विश्वासार्हता ही ७० टक्के असून दर दिवशी १० पैकी किमान सात टेस्ट ह्या अचूक निदान करत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे़
१४ जुलै रोजी आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनेट आणि रॅपिड अँटीजेन या दोन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत संपर्क तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या याच ठिकाणी करण्यात येत आहेत़ यातून धुळे येथे पाठवले जाणारे स्वॅब आणि तेथून येणारे रिपोर्ट यांची प्रतिक्षा कमी झाली आहे़ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रॅग्णाचा रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल हा काही वेळात आल्यानंतर त्यानुसार उपचार दिला जात आहे़ दरम्यान अँटीजेन टेस्ट नेगेटिव्ह असतानाही एखाद्यात कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची ट्रूनेट आणि आरटी पीसीआर टेस्ट केली जात आहे़ जिल्ह्यात करण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या एकूण अहवालांमध्ये बदल होण्याचे प्रमाण ३० टक्केच आहे़ दरम्यान आरटी-पीसीआर टेस्टसाठी अद्यापही धुळे येथे स्वॅब पाठवावे लागत आहेत़ जिल्ह्यात रॅपिड टेस्टपूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही मर्यादित होती़ मात्र अँटीजेन टेस्ट होवू लागल्यानंतर दर दिवशी रुग्ण समोर येत असल्याचे दिसून येत आहे़ यातून गंभीर अशा रुग्णाचा रिपोर्ट तात्काळ समोर आल्यानंतर उपचारांना दिशा मिळत आहे़

जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये आजअखेरीस २७६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत़ यातून ६९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या़ तर २०७ रिपोर्ट हे नेगेटिव्ह आले आहेत़
दुसरीकडे ट्रूनेट मशिनवर १०५ स्वॅब तपासण्यात आले आहेत़ यातील ३० स्वॅॅब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत़
दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आलेल्या टेस्टची पडताळणी करण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आले होते़ याठिकाणी आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर रॅपिड अँटीजेनमधून आलेला रिपोर्ट हा योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़
यात लक्षणे असतानाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या अँटीजेन टेस्टची पडताळणी करण्यात आली होती़ यातील केवळ ३० टक्के स्वॅबचे रिपोर्ट हे बदलले असल्याचे समोर आले आहे़ उर्वरित ७० टक्के स्वॅब रिपोर्ट हे जैसे थे राहिल्याची माहिती देण्यात आली आह़े़
रॅपिड अँटीजेन हे एक प्रभावी तंत्रज्ञान असल्याचा दावा करण्यात येत आहे़ जिल्हा रुग्णालयात प्रारंभी अँटीजेनच्या ५०० कीट मागवण्यात आल्या होत्या़ आता केवळ २०० कीट शिल्लक राहिल्या आहेत़ या कीट नव्याने मिळाव्यात यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच वाढीव कीट मिळतील अशी माहिती देण्यात आली आहे़

जिल्हा रुग्णालयात वापरण्यात येणाºया अँटीजेन टेस्टमुळे गंभीर रुग्णांच्या उपचारांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ यातून मृत्यूदर हा कमी झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे़ एखादा अतीगंभीर रुग्णाचा अहवाल अँटीजेनमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात़ त्यानंतर ट्रूनेट आणि धुळे येथील पीसीआरसाठी स्वॅब नमुने पाठवण्यात येतात़ या नमुन्यांचेही अहवाल तंतोतंत खरे आल्याचा दावा करण्यात आला आहे़ एखाद्या रुग्णाचा आधीच मृत्यू झाला असल्यास त्याचे स्वॅबही अँटीजेनद्वारे तपासून निकाल दिला गेला आहे़

Web Title: Rapid antigen success in swab verification is 70%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.