प्रकाशाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दुर्मिळ साळींदरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:38 PM2020-07-21T12:38:57+5:302020-07-21T12:39:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्मिळ प्रजातीचे साळींदर ठार झाल्याची घटना सोमवारी ...

Rare Salinder dies in leopard attack near light | प्रकाशाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दुर्मिळ साळींदरचा मृत्यू

प्रकाशाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दुर्मिळ साळींदरचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्मिळ प्रजातीचे साळींदर ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ दरम्यान हा प्रकार सुरू असताना प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्याने बिबट्यानेच साळींदर ठार केल्याच्या घटनेला दुजोरा मिळत आहे़
सोमवारी सकाळी प्रकाशा ते नांदरखेडा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या ग्रामस्थांना साळींदर मृतावस्थेत आढळून आला़ काटेरी केस लांबवर विखुरल्याचे तसेच शरीरावर जखमा असलेले साळींदर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून येत होते़ यावेळी शेतातून परत येणाऱ्या एका युवकाने याठिकाणी बिबट्या पाहिल्यानंतर या मार्गाने जाणाऱ्यांना तो सतर्क करुन तिकडे जावू नका असे सूचित करत होता़ या युवकाने साळींदरवर बिबट्याने हल्ला केला असल्याची माहिती दिली़ दरम्यान साळींदरच्या मानेवरसह शरीराच्या इतर भागावर हिंस्त्र प्राण्याच्या पंजाच्या खूणा असल्याचे दिसून आले़ यामुळे साळींदरला बिबट्याने ठार मारले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे़
दरम्यान प्रकाशा परिसरात आजवर साळींदर आढळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ आहे़ या प्राण्याचे अस्तित्त्व जंगलासह शेतशिवारात असते़ तीन फूट उंची असलेल्या या प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर दुपारपर्यंत त्याच्या शरीराचे कुत्र्यांनी लचके तोडून नेले होते़ दुपारी प्रकाशा ते नांदरखेडा रस्त्यावर केवळ साळींदरचे काटे पडले होते़ वनविभागाच्या कर्मचाºयांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आहे़

साळींदरच्या मान आणि पोटाच्या भागावर हल्ला झाल्याने हिंस्त्र प्राण्याने तो केला असावा असा अंदाज आहे़ गावाकडे येणाºया युवकाने रात्री बिबट्याला ऊसाच्या शेतात पळताना पाहिल्याने बिबट्या आणि साळींदर यांच्यात खूपवेळ संघर्ष सुरू असावा असा अंदाज आहे़ साळींदरचे काटे जागोजागी पडून होते़ दरम्यान या भागात बिबट्याचा संचार असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना करून माहिती घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़

Web Title: Rare Salinder dies in leopard attack near light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.