शहाद्यात आढळला दुर्मिळ सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:37 PM2019-08-06T12:37:16+5:302019-08-06T12:37:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा शहरातील शुभमनगरात अंडी खाणारा दुर्मिळ भारतीय साप आढळून आला़ सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापाची ...

A rare snake found in martyrs | शहाद्यात आढळला दुर्मिळ सर्प

शहाद्यात आढळला दुर्मिळ सर्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा शहरातील शुभमनगरात अंडी खाणारा दुर्मिळ भारतीय साप आढळून आला़ सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापाची वनविभागात नोंद करुन जंगलात सोडून देण्यात आल़े 
शहादा येथील शुभमनगर मधील तलाठी क:हाड यांचाकडे साप निघाला. सर्पमित्र भिमसेन रावताळे, दिपक मोरे यांनी जावून सापाला पकडले. हा साप दुर्मिळ असल्याचे लक्षात येताच सर्पमित्र अमोल जमादार,सागर निकूंभे यांनाही बोलावण्यात आले. निमविषारी काळसर तपकीरी रंगाच्या या सापाला डिवचल्यावर तोंड उघडे ठेवून हल्ला करतो. 
झाडावर सहज चढणा:या या सापाच्या पाठीवर तोंडापासून ते शेपूटपयर्ंत पांढरी रेषा असते. शरीर चपटे व त्रिकोणाकार असते. याचे वैशिष्ट नावाप्रमाणेच असून सुरूवातीच्या मणक्यात खाली असलेला भाग पात्यासारखा असतो. अन्ननलीकेत अंडे गिळत असताना पात्यामुळे अंडे फुटून द्रवपदार्थ आत जातो तर कवच बाहेर टाकले जाते.पाली,सरडे,पक्षी यांची अंडी खावून हा साप जत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली़ यावरूनच अंडीखाऊ साप म्हणून ओळखले जात़े दुर्मिळ असा हा अंडीखाऊ साप 2005 साली अमरावती येथे  सापडल्याची नोंद असून यवतमाळ,वर्धा नंतर नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे वनविभागात गिरासे यांनी अधिकृत नोंद केली आहे.वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंडीखाऊ सापाला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: A rare snake found in martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.