विविध मागण्यांसाठी धडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:35 AM2018-03-27T11:35:53+5:302018-03-27T11:35:53+5:30
अधिका:यांची चर्चा : वीज, पाणी आणि रस्त्यासाठी आंदोलन
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : तालुक्यातील विविध गाव पाडय़ांवर रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सोयीही नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त झाले आहेत़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे धडगाव बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला़
आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, जिल्हा उपप्रमुख गणेश पराडके, संघटन प्रमुख रामू वाडिले, महेश पाडवी, उपतालुका प्रमुख दिलीप पाडवी, पिंटू वळवी, शंकर वळवी, जयप्रकाश परदेशी, लक्ष्मण वाडिले, रामा जांगडे, मुकेश वळवी, प्रताप पटले आदी उपस्थित होत़े प्रारंभी जुने धडगाव येथून पायी चालत जाऊन आंदोलकांनी बसस्थानकार्पयत मोर्चा काढला़
दरम्यान मार्गदर्शन करताना आमश्या पाडवी म्हणाले की, 70 वर्ष उलटूनही आदिवासी बांधवांना केवळ वीज, पाणी आणि रस्ते यासाठी लढावे लागत आहेत़ पीएमजीएसवाय आणि सीएम जीएसवाय या योजना राबवूनही दुर्गम भागार्पयत रस्तांचे जाळे निर्माण करण्यात प्रशासनाला अपयश आले आह़े
प्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून 2013-14 साली मंजूर दुहेरी सोलर पंप बसवण्यात मोठा भ्रष्टाचार झाला आह़े पाडय़ांवर विद्युतीकरण योजनेचीही चौकशी करण्याची गरज आह़े वेलखेडीचा वाटलदी पाडय़ावर आजवर वीजच पोहोचू शकलेली नाही़ गोराआंबा, इअडीपाडा परिसरात रस्ते व पाण्याची सोय व्हावी, नलदापाडा, पौला, माकडकुंड, पिंप्रीपाडा, गोराडीचा आमलीपाडा रस्ता दुरूस्त व्हावा, धडगाव तालुक्यातील गावांमध्ये विजेची सोय करण्यात यावी, तोरणमाळ येथील यशवंत तलावातील गाळ काढण्यात यावा, निगदी येथे पाझर तलाव मंजूर व्हावा यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या़