रेशनकार्ड धारकांना आता केवळ तीन दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:42 PM2021-01-29T12:42:07+5:302021-01-29T12:42:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेशनकार्डधारक सदस्यांचे आधार लिकिंग करण्यासाठी ३१ जानेवारी ही शेवटची मुदत आहे. ज्यांचे आधार लिंकीग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेशनकार्डधारक सदस्यांचे आधार लिकिंग करण्यासाठी ३१ जानेवारी ही शेवटची मुदत आहे. ज्यांचे आधार लिंकीग होणार नाही त्यांचे नावे व रेशनकार्ड हे १ फेब्रुवारीपासून रद्द होणार आहे. त्यामुळे कार्डधारक व रेशनदुकानदार यांनीही येत्या तीन दिवसात आधार लिंकिंगचे काम पुर्ण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.
रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक रेशनकार्ड हे आधार संलग्नीत करण्यात येणार आहे. त्याचे काम जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुुलनेत चांगले झाले आहे. आता ३१ जानेवारी ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी आदेश काढले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत रेशनकार्ड आधार संलग्न न झाल्यास फेब्रुवारीपासून रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार नाही.
रास्तभाव दुकानातील ई-पॅास उपकरणातील ईकेवायसी व मोबाईल सिडींग सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात यावे. धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॅास उपकरणाद्वारे दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात दोन लाख ७६ हजार ७१७ रेशनकार्डधारक आहेत.
दरम्यान, दिलेल्या मुदतीत आधार संलग्न रेशनकार्डचे काम पुर्ण झाल्यास संबधीतांना पुढील काळात रेशन मिळणार नाही असेही जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी स्पष्ट केले.