चिखली आश्रमशाळेत श्यामची आई पुस्तकाचे अभिवाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:36+5:302021-09-24T04:36:36+5:30
जिल्हा प्रशिक्षण शिक्षण संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि तळोदा व नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ...
जिल्हा प्रशिक्षण शिक्षण संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि तळोदा व नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चिखली आश्रम शाळेचे शिक्षिका रंजना मोरे यांनी ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. आदिवासी समाजातील बालकांवर साने गुरुजींच्या विचारांची मूल्य रुजविण्याचे कार्य यातून सुुरु झाल्याची प्रतिक्रिया शिक्षण विभाग आणि प्रकल्प कार्यालय विभागाकडून देण्यात आली आहे. उपक्रमासाठी शिक्षिका मोरे ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी कोरोना काळात देखील सक्रिय होत्या. ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासक्रम व्यतिरिक्त बाल जीवनातील व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी विषयांवर त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जात होते.
याबाबत शिक्षिका रंजना मोरे यांनी सांगितले की, साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ हे पुस्तक बालकांच्या मनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी उपयुक्त असे साधन आहे. समृद्ध जीवनाचा मूलमंत्र व लहान मुलांचे भावविश्व ओळखून त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून समाजात एक उत्तम माणूस घडवण्याचा प्रयत्न यातून होऊ शकतो.