भयमुक्त वातावरणात सण उत्सव साजरे करण्यासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:10 PM2019-08-29T12:10:36+5:302019-08-29T12:10:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात साजरा होणारा गणेशोत्सव, मोहरम आणि उरुस आणि इतर सण-उत्सव भयमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी ...

Ready to celebrate the festival in a fear-free environment | भयमुक्त वातावरणात सण उत्सव साजरे करण्यासाठी सज्ज

भयमुक्त वातावरणात सण उत्सव साजरे करण्यासाठी सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात साजरा होणारा गणेशोत्सव, मोहरम आणि उरुस आणि इतर सण-उत्सव भयमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस दल सज्ज असून कायदा मोडणा:यांवर कारवाई होणारच असा इशारा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिला़ बुधवारी जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होत़े        
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात झालेल्या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एऩडी बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष परवेज खान, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पुंडलिक सपकाळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, नवापुर पालिका गटनेता नरेंद्र नगराळे, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, बाळासाहेब भापकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध गणेशमंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत़े
बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी सांगितले की, जिल्ह्यात येत्या काळात होणा:या  सण उत्सवांसाठी पोलीस दल सर्वतोपरी सज्ज आह़े कायद्याची अंमलबजावणी होणार, कायदा मोडणा:याची गय केली नाही़ उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आटोक्यात आणण्यासाठी पोलीस सक्षम आह़े नोंदणीशिवाय वर्गणी मागणारे आणि ध्वनीप्रदूषण करणा:या मंडळांवर कारवाई होणार आह़े शहरी आणि ग्रामीण भागातील उत्सवावर पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आह़े मंडळांनी या उत्सवांचा विधायक कार्यासाठी उपयोग करावा़ 
अप्पर जिल्हाधिकारी बोरुडे यांनी सांगितले की, लोकांच्या मनातील नैराश्य दूर व्हावे यासाठी सण उत्सव साजरे केले जातात़ परंतू सण उत्सवच जर भितीत साजरे होत असतील तर का, साजरे करावेत असा प्रश्न आह़े नागरिकांनी भयमुक्त होऊन सामाजिक सलोखा ठेवून उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा़
उपनगराध्यक्ष परवेज खान यांनी शहरातील मुस्लिम बांधव मशिदींच्या परिसरात येणा:या सर्व मंडळांच्या स्वागत आणि विसजर्न मिरवणूकांवर फुलांची उधळण करणार असल्याचे सांगितल़े बैठकीत कार्ली येथील पोलीस पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी 5 हजार रुपये देण्याचे घोषित केल़े जिल्ह्यातील शांतता कमिटी सदस्यांनी विविध विषयांवर समस्या मांडून चर्चा केली़ प्रास्ताविक उपअधिक्षक रमेश पवार तर सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक निवृत्ती पाटील यांनी केल़े

बैठकीत बोलताना पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी, जिल्ह्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा पारंपरिक आह़े जिल्ह्यातील शांतता कमिटीच्या सदस्यांनी मांडलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यावर भर दिला जाईल़ जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त गणेशोत्सव, मोहरम आणि उरुस साजरा करता यावा याकरिता पोलीस प्रशासन दक्ष असून 24 तास सज्ज राहणार आह़े नागरिकांसह मंडळांच्या पदाधिका:यांनी सहकार्य केल्यास उत्सवाला अधिक झळाळी येईल़ पारंपरिक गणेशोत्सवाची जिल्ह्याला परंपरा असल्याने येथे गुलालाची उधळण मोठय़ा प्रमाणावर केली जात़े यातून अनुचित प्रकार घडण्याची भिती असत़े यावर मात करण्यासाठी मंडळांनी गुलालाऐवजी मिरवणूकीत फुलांचा वापर करावा, यासाठी पोलीस दलाकडून सहकार्य केले जाईल, असे सांगितल़े त्यांच्या या सूचनेचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आल़े 

पोलीस दलाकडून मंडळांच्या सोयीसाठी ऑनलाईन परवानगी पोर्टल सुरु करण्यात आले आह़े या पोर्टलवर तात्काळ नोंदणी होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली़ यामुळे कोणत्याही मंडळाच्या पदाधिका:यांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही़ दरम्यान त्यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकातील दगडफेकीच्या घटनेवेळी शांतता कमिटीचे सदस्य न आल्याचे सांगून सदस्यांनी अशावेळी पोलीसांना साथ देण्याची अपेक्षा व्यक्त केली़  
 

Web Title: Ready to celebrate the festival in a fear-free environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.