कोविड कक्षासाठी २०० आॅक्सिजन सिलींडर मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:54 PM2020-07-20T13:54:38+5:302020-07-20T13:54:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा अपूर्ण पडत आहेत़ यातून कक्षासाठी लागणाऱ्या ...

Received 200 oxygen cylinders for covid orbit | कोविड कक्षासाठी २०० आॅक्सिजन सिलींडर मिळाले

कोविड कक्षासाठी २०० आॅक्सिजन सिलींडर मिळाले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा अपूर्ण पडत आहेत़ यातून कक्षासाठी लागणाऱ्या आॅक्सिजन सिलींडरबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ यातून कक्षांसाठी १०० सिलींडर हवेत ही स्थिती मांडली गेली़ वृत्ताची दखल घेत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने २०७ सिलींडर खरेदी केले आहेत़
कोरोना संसर्ग झाल्यानंतर श्वास घेण्यास तकलीफ होणाºया रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्ष आणि नर्सिंग कॉलेज या दोन ठिकाणी व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली आहे़ या व्हेंटीलेटरसाठी आॅक्सिजन सिलींडर वेळोवेळी लागत आहेत़ जिल्हा रुग्णालयात धुळे येथून सिलींडरचा पुरवठा दररोज पुरवठा करण्यात येतो़ मात्र दरदिवशी वाढत असलेले रुग्ण आणि मयतांची संख्या पाहता आॅक्सिजन सिलींडर वाढीव हवेत अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली होती़ ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केल्याच्या केवळ चार दिवसात जिल्हा रुग्णालयाने वाढीव सिलींडर खरेदी करुन धुळे येथील ठेकेदाराला ते भरुन पाठवण्याचे सूचित केले आहे़ वाढीव सिलींडर मिळाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांची सोय होणार आहे़ मागवण्यात आलेले सर्व सिलींडर तातडीने भरुन देण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे़
कोविड कक्षातील किमान ३५ बेडसाठी वेळोवेळी दोनपेक्षा अधिक सिलींडर्सचा वापर करण्यात येत असल्याने दिवसभरात किमान ५० च्या जवळपास सिलींडरचा वापर होत असल्याची माहिती आहे़ यात धुळे येथून ६० पेक्षा अधिक सिंलीडर येत नसल्याने उपचार सुरू असताना तुटवड्याची शक्यता निर्माण होत होती़ एखादा गंभीर रुग्ण उपचार घेत असताना सिलींडर संपल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाने सिलींडर खरेदी करुन घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे़

जिल्हा रुग्णालयाने ठाणे येथून हे सिलींडर खरेदी केली असल्याची माहिती आहे़ यात २०७ सिलींडर हे एक हजार लीटरपेक्षा अधिक क्षमता असलेले जंबो सिलींडर आहेत़ उर्वरित १३० सिलींडर हे मोठ्या क्षमतेचे आहेत़ खाली सिलींडर उपलब्ध झाल्यानंतर तातडीने ते आॅक्सिजन भरण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहेत़ तेथून दरदिवशी सिलींडर जिल्हा रुग्णालयात पुरवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील इतर अपुºया सुविधांसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे़

जिल्हा रुग्णालयात ६६०, एक हजार ३२० लीटर क्षमता आणि जम्बो अशा तीन प्रकारचे सिलींडर पुरवले जातात़ सोबत १ हजार ८५१ लीटर क्षमतेचे नायट्रोक्स आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड आदी सिलींडरचा पुरवठा करण्यात येतो़ कृत्रिम श्वास प्रणालीसाठी या सिलींडरचा वापर करण्यात येतो़ रुग्णालयाच्या नेत्र कक्षात २५ तर नर्सिंग कॉलेजमध्ये १० अशा ३५ बेडला हे सिंलीडर लावून रुग्णांच्या शरीरातील आॅक्सिजन लेव्हलवर नियंत्रण ठेवण्यात येते़ यासाठी हे सिलींडर्स उपयोगी होते़ त्यांची खरेदी झाल्याने प्रश्न मिटला आहे़

Web Title: Received 200 oxygen cylinders for covid orbit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.