दुष्काळी तालुक्यांसाठी 42 कोटी 60 लाख प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:42 AM2019-02-07T11:42:34+5:302019-02-07T11:42:51+5:30

पहिला हप्ता 3400 रुपये : 2016 च्या दुष्काळाचीही मदत प्राप्त

Received 42 crores 60 million for drought-hit villages | दुष्काळी तालुक्यांसाठी 42 कोटी 60 लाख प्राप्त

दुष्काळी तालुक्यांसाठी 42 कोटी 60 लाख प्राप्त

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदतनिधी म्हणून जिल्ह्याला 42 कोटी 61 लाख 88 हजार 800 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. नंदुरबार व शहादा तालुक्याला प्रत्येकी 12 कोटी मिळाले आहेत. पहिला हप्ता हेक्टरी 3400 रुपये लवकरच लाभार्थी शेतक:यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील चार तालुके संपुर्णपणे दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. नंदुरबार व शहादा तालुक्याला प्रत्येकी 42 कोटी तर नवापूर तालुक्यासाठी 10 कोटी 61 लाख 88 हजार व तळोद्यासाठी आठ कोटी रुपये मिळाले आहेत. खरीप पिकाचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधीक नुकसान झाल्याने बाधीत झालेल्या सर्व शेतक:यांना देय असलेल्या मदतीची रक्कम दोन हप्त्यात देण्यात येणार आहे. एकुण सहा हजार 800 रुपये प्रती हेक्टर  अनुदान असून त्याचा पहिला हप्ता तीन हजार 400 रुपये किंवा किमान एक हजार रुपये यापैकी अधीक असेल ती रक्कम दिली जाईल. देण्यात येणारी रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत व लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेर्पयतच राहील.  
दरम्यान, 2016 मध्ये नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये दुष्काळ होता. त्यासाठी चार कोटी 60 लाख रुपये अनुदान ाअले आहे. ज्या शेतक:यांचा विमा होता त्यांना विम्याची रक्कम तर ज्यांचा नव्हता त्यांना विम्याच्या रक्कमेची निम्मे रक्कम मिळणार आहे. नंदुरबार तालुक्यासाठी चार कोटी 50 लाख तर शहादा तालुक्यासाठी 10 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याचेही जिल्हाधिका:यांनी सांगितले.    

Web Title: Received 42 crores 60 million for drought-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.