शिवरायांचे चरित्र आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:48 AM2018-12-25T11:48:31+5:302018-12-25T11:48:36+5:30
प्रकाशा : सवरेदय विद्यामंदिरात ‘कसे घडवाल बाळराजे’वर र्मादर्शन
प्रकाशा : प्रकाशा ता़ शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे ‘कसे घडवाल बाळराजे’ या व्याख्यान मालेचा कार्यक्रम झाला. पुणे येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व कीर्तनकार निलेश कोरडे यांनी ‘सैराट’ झालेली तरुणपिढी व आपल्या संस्कृती, संस्कार या गुणापासून दूर होत चाललेल्या तरुणपिढीला योग्य दिशा, मार्गदर्शन व प्रबोधन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र व आई जिजाऊ यांनी महाराजांवर केलेले संस्कार याची उत्तम जोड देऊन व विविध प्रकारचे दाखले देऊन त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. तरुण पिढीने भावनेच्या भरात वाहून न जाता देशाप्रती आपली कर्तव्य ओळखावी, आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या असेही यावेळी सांगण्यात आल़े या वेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होत़े यात, युवक व युवतींची संख्या लक्षणीय होती़
आपल्या पहाडी आवाजावर त्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली. रसिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य आय.डी.पटेल यांनी सर्वोदय विद्या मंदिराची माहिती दिली़
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हाईस चेअरमन हिरालालभाई पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील विविध शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रा.शरद पाटील यांनी आभार मानले.