सलग आठव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:05 AM2019-10-25T11:05:04+5:302019-10-25T11:05:10+5:30

अनिल जावरे।  लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सलग आठव्यांदा विजय मिळविण्यात अॅड.के.सी.पाडवी यांना यश आले. शिवसेना उमेदवाराला येथे बंडखोरीचा ...

A record of being elected for the eighth time in a row | सलग आठव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

सलग आठव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

Next

अनिल जावरे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : सलग आठव्यांदा विजय मिळविण्यात अॅड.के.सी.पाडवी यांना यश आले. शिवसेना उमेदवाराला येथे बंडखोरीचा फटका बसल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. शेवटच्या फेरीर्पयत मतमोजणीतील रंगत उत्कंठावर्धक ठरली होती. 
अक्कलकुवा मतदारसंघ यंदा हॉट मतदारसंघात गणला गेला होता. युतीअंतर्गत ही जागा शिवसेनेला सुटली होती. सेनेतर्फे येथे जिल्हाप्रमुख आमशा फुलजी पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यता घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे धडगाव तालुकाध्यक्ष विजयसिंग पराडके आणि जि.प.सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समिकरणे बदलली. सलग सात वेळा विजयी झालेले अॅड.के.सी.पाडवी यांना रोखण्यासाठी शिवसेनेने हरत:हेने प्रय} केले. परंतु अॅड.के.सी.पाडवी यांनी आपला गड राखण्यात यश मिळविले. 
बंडखोरीचा फटका
युतीअंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने भाजपतर्फे इच्छूक असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करीत बंडखोरी केली. त्यांची उमेदवारी मागे घेतली जावी यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे हरत:हेने प्रय} केले गेले. परंतु नागेश पाडवी यांनी माघार घेतली नाही. परिणामी या ठिकाणी युतीअंतर्गत बंडखोरी होऊन सरळ होणारी लढत ही तिरंगी झाली. त्यामुळे  रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून होते.
रघुवंशी यांची मेहनत
प्रचारतंत्र आणि निवडणूक लढविण्याचे नियोजन आत्मसात असलेले आणि राजकीय मुरब्बी नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अक्कलकुवा मतदार संघाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आपले पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लावले. अक्कलकुवा, मोलगी आणि धडगाव शहरातील नाराज मंडळींना जवळ घेतले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धडगाव येथे जाहीर प्रचार सभा देखील घेतली. परिणामी शिवसेनेच्या उमेदवाराने या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली. 
अॅड.पाडवींचे प्रचारतंत्र
गेल्या सात निवडणुकीचा अनुभव असलेले आणि गेल्या 35 ते 40 वर्षापासून कार्यकर्ते जोडल्याने काँग्रेसचे उमेदवार आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी आपल्या प्रचार तंत्राने मतदारसंघात प्रत्येक मतदारार्पयत पोहचण्याचा प्रय} केला. यापूर्वी अथार्त पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचा फायदाही त्यांना या निवडणुकीत झाला. माजी मंत्री कै.दिलवरसिंग पाडवी यांचे सुपूत्र नागेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागीतली होती. मात्र हा मदतार संघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली. या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारास मोठा फटका बसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे. अक्कलकुवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अॅड.के.सी. पाडवी यांना 82770 मते मिळाली असून, महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी यांना 80,674 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार नागेश पाडवी यांना 21 हजार 664 मते मिळाली आहेत. 
एकुणच तिरंगी लढतीचा फटका शिवसेनेला बसून काँग्रेस उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी निसटता विजय मिळविला. 

Web Title: A record of being elected for the eighth time in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.