8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:19 PM2017-12-05T12:19:36+5:302017-12-05T12:19:40+5:30

Recovery of 22 lakhs in 8 months: Action taken by Nandurbar tehsil office | 8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई

8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई

Next
ठळक मुद्दे11 वाहनधारकांनी भरला दंड एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या काळात नंदुरबार तालुक्यातील विविध रस्त्यांवरून विनापरवाना वाळू वाहतूक करणा:या 62 वाहनांवर तहसीलदार नितीन पाटील यांनी कारवाई केली होती़ यातून 22 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े गेल्या आठवडय़ात 19 अ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े  
लगतच्या गुजरात राज्यातील विविध वाळू ठेक्यांवरून उपसली जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात चढय़ा दरात विक्री करण्याचा अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षापासून वाढीस लागला आह़े रात्री अपरात्री चोरटय़ा मार्गानी नंदुरबार शहराकडे येणा:या या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर ग्रामीण भागातील रस्त्यांची ‘वाट’ लागली होती़ याबाबत ग्रामीण भागातून सातत्याने तक्रारी केल्यानंतर एप्रिल 2017 पासून कारवाई सुरू केली होती़ यात 62 वाळू वाहतूक करणारी वाहने तहसील प्रशासनाने जप्त करून कारवाई केली आह़े 

Web Title: Recovery of 22 lakhs in 8 months: Action taken by Nandurbar tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.